पुलवामा घटनेच्या निषेधार्थ शोभायात्रा रद्द 

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

नांदेड : पुलवामा घटनेच्या निषेधार्थ विश्‍वकर्मा जयंतीनिमित्त सिडको- हडको भागात काढण्यात येणारी शोभायात्रा विश्‍वकर्मा जयंती मंडळाच्या वतीने रद्द केली. यावर होणारा नऊ हजार रुपयाचा खर्च त्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे सुपूर्त केला. हुतात्मा झालेल्या सैनिकांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहिली. 

रविवारी (ता. 17) विश्‍वकर्मा जयंती मोठ्या उत्साहाने शहरात व सिडको- हडको भागात साजरी करण्यात येणार होती. परंतु नुकत्याच झालेल्या पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे जवान हुतात्मा झाले. हा देशावरील मोठा हल्ला असून त्या घटनेच्या निषेधार्थ व सैनिकांचा उत्साह वाढविण्यासाठी काढण्यात येणारी शोभायात्रा रद्द करण्यात आली. या शोभायात्रेसाठी मंडळाकडे जवळपास नऊ हजार रुपये जमा झाले होते. रविवारी सकाळी जयंती मंडळाच्या वतीने हुतात्मांना श्रध्दांजली वाहिली.

जमा झालेला निधी त्यांनी सशस्त्र सेना ध्वजदिन निधीला दिला. रोख नऊ हजार रुपये या मंडळाच्या वतीने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे समन्वयक कमलाकर शेटे यांच्याकडे सुपूर्त केले. या कार्यालयाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून हा निधी स्विकारला. यावेळी विश्‍वकर्मा जयंती मंडळाचे नामदेव पांचाळ, बालाजी पांचाळ सालेगावाकर, बाळु सुर्यवंशी, बबन लोकडे, बाळु सुर्यवंशी, सिध्दार्थ कांबळे, गणेश सुर्यवंशी यांच्यासह आदींची उपस्थिती होती. सैनिक कल्याण कार्यालय व जिल्हा प्रशासनाच्या वतीने या जयंती मंडळाचे कौतुक करण्यात आले.  

Web Title: rally cancelled due to pulawama terror attack