दुष्काळप्रश्नी माकपचा माजलगावत मोर्चा

कमलेश जाब्रस
बुधवार, 5 डिसेंबर 2018

माजलगांव (बीड) : मागील दोन महिण्यांपासुन दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने शासनाने दुष्काळ जाहिर केला मात्र कसल्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या नसुन तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात या मागणीसाठी माकपच्या वतीने शेतकरी, शेतमजुर यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आज (ता. 5) बुधवारी मोर्चा काढण्यात आला. 

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शहरातुन शेतकरी, शेतमजुरांचा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. दुष्काळग्रस्त शेतक-यांना हेक्टरी पन्नास हजार रूपये तर मजुरांना विस हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, शेतक-यांचे कर्ज माफ करून नविन कर्ज देण्यात यावे, जनावरांना दावणीला चारा पाणी देण्याची व्यवस्था करावी, बोंडअळीचे अनुदान द्यावे, शेतक-यांचे संपुर्ण विज बिल माफ करावे, कापसाला दहा हजार रूपये प्रतिक्विंटल भाव द्यावा या मागण्यांचे निवेदन नायब तहसिलदार रामदासी यांना देण्यात आले. या मोर्चात महिलांचा मोठा सहभाग होता.

Web Title: rally by Marxist communist party in majalgaon