श्रीरामाचे नव्हे, तर नथुरामाचे भक्त - कन्हैयाकुमार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

औरंगाबाद -  ""मोदी सरकारने गेल्या साडेचार वर्षांत देशवासीयांना केवळ लालीपॉप दिले. सरकारला एकही आश्वासन पूर्ण करता आले नाही, म्हणूनच निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा राममंदिराचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. हे श्रीरामाचे नव्हे, तर नथुरामाचे भक्त आहेत,'' अशी घणाघाती टीका विद्यार्थी नेते तथा ऑल इंडिया स्टुडंट्‌स फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कन्हैयाकुमार यांनी केली. 

संविधान बचाव-देश बचाव परिषदेत रविवारी (ता. नऊ) आमखास मैदानावर कन्हैयाकुमार यांची जाहीर सभा झाली. यावेळी मुख्य संयोजक आमदार सतीश चव्हाण, बाबाजानी दुर्राणी, भाकपचे राज्य सचिव तुकाराम भस्मे, प्रा. राम बाहेती, इलियास किरमाणी, प्रा. सुनील मगरे, ऍड. अभय टाकसाळ यांच्यासह विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. कन्हैयाकुमार म्हणाले, ""राममंदिर बांधण्यासाठी नाही; तर सरकार बनवण्यासाठी बाबरी मशीद पाडली. त्यानंतर भाजपची दोनवेळा सत्ता आली. थापा मारून सत्तेवर आलेल्या भाजपला पुन्हा श्रीरामाची आठवण झाली आहे. मोदी मंदिरात गेले तर देशभक्ती आणि राहुल गांधी मंदिरात गेले तर मतांसाठी... हे कसे,'' असा प्रश्‍नही कन्हैयाकुमार यांनी केला. 

मोदी सरकारचा लोकशाहीवर हल्ला सुरू झाला आहे. देशातील स्वायत्त संस्था सरकारच्या दबावात आहेत. देशातील संविधान धोक्‍यात आलेले आहे. संविधान वाचवण्यासाठी विविध पक्षांनी एकत्र आले पाहिजे. आपसातील 80 टक्के मतभेद बाजूला ठेवून संविधानाच्या मुद्यावर एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशात गोरगरीब, महिला, शेतकरी, बेरोजगारी असे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. हे प्रश्‍न सोडविण्यासाठी सरकार अपयशी झाले आहे, अशी टीकाही त्यांनी केली. 

नेमके काय म्हणाले कन्हैयाकुमार... 
व्यवस्थेला प्रश्‍न विचारणाऱ्याला देशद्रोही ठरवले जात आहे. 
वर्षाला देशात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या. 
फॉर्म भरण्याचा सपाटा; मात्र एकही नोकरी लागत नाही. 
बेरोजगारी, गरिबी वाढली, उपाययोजनांचा पत्ता नाही. 
प्रियांका, अनुष्काच्या रिसेप्शनसाठी पंतप्रधानांकडे वेळ आहे. 
शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यास पंतप्रधानांना वेळ नाही.

Web Title: Ram temple issue again for election says Kanhaiya Kumar