चाकूरला रमजान ईदनिमित्त कोरोनापासून जनतेचे रक्षण करण्याची प्रार्थना

Ramazan Eid Celebration Chakur News
Ramazan Eid Celebration Chakur News

चाकूर (जि.लातूर) ः मुस्लीम बांधवांनी रमजान ईदनिमित्त सोमवारी (ता.२५) सकाळी घरात राहूनच नमाज पठण केले व कोरोना महामारीपासून देशातील व राज्यातील जनतेचे रक्षण करावे अशी प्रार्थना केली. मुस्लीम समाजात पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान महिन्याची सुरवातच कोरोनाच्या टाळेबंदीत झाली. यामुळे सुरवातीपासून मुस्लीम बांधवांना मशिदीमध्ये न जाता घरातच नमाज पठण करण्यास सुरवात केली होती.

टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यातही कोरोनाचा प्रार्दुभाव कमी होत नसल्यामुळे रमजान ईदची नमाज ही घरातच करावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. यास प्रतिसाद देत मुस्लीम बांधवांना शारीरिक अंतर ठेवत घरीच रमजानची नमाज पठण केली व मौलाना गुलाम रसुल, सय्यद इसा मौलाना, सय्यद हुसेन मौलाना, उमर मौलाना, मतीन कारी यांच्यासह सर्व मुस्लिम बांधवांना कोरोना महामारीपासून जनतेचे रक्षण करावे अशी प्रार्थना केली. मुस्लीम बांधवांना आमदार बाबासाहेब पाटील, तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे, पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण, नगराध्यक्षा रुपाली पवार, उपनगराध्यक्ष नितीन रेड्डी, सिनेट सदस्य अॅड. युवराज पाटील, नगरसेवक इलियास सय्यद, माजी सभापती करीमसाहेब गुळवे, मुर्तजा सय्यद, चाँद मासुलदार साजीद लखनगावे, पप्पुभाई शेख, रिजाझ पठाण, सलीम तांबोळी, इसुब शेख, करीम डोंगरे, ईलियास शेख आदींनी शुभेच्छा दिल्या.


एसटी पडते जागोजागी बंद
चाकूरमध्ये टाळेबंदीत तब्बल दोन महिने बंद असलेल्या एसटी सुरू झाल्या असून नादुरुस्त असलेल्या एसटी जागोजागी बंद पडत असल्यामुळे ‘दे धक्का’ म्हणायची वेळ वाहकांवर येत आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील एसटी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. चौथ्या टाळेबंदीत ही सेवा शुक्रवारपासून (ता.२२) सुरू करण्यात आली आहे. तुरळक प्रवासी सध्या एसटीने प्रवास करीत आहेत. नादुरुस्त असलेल्या एसटीची दुरुस्ती न करता, आहे त्याच अवस्थेत त्या पाठविल्या जात आहेत. सध्या मोजक्याच रस्त्यांवर एसटीची सेवा सुरू असूनही नादुरुस्त एसटी बाहेर काढल्या जात आहेत.

लातूर आगाराची एसटी (एमएच- २०, बीएल- ०२४५) शनिवारी (ता.२३) दुपारी येथील बसस्थानकात आली असता चालकाने वाहतूक नियंत्रकांकडे नोंद करून पुन्हा एसटी सुरू करण्याचा प्रयत्न केला असता ती सुरू होत नव्हती, तब्बल अर्धा तास प्रयत्न करूनही एसटी सुरू होत नसल्यामुळे इतर एसटीच्या चालक व वाहकांनी धक्का मारण्यास सुरवात केली. तरीही ती सुरू होत नव्हती शेवटी दुसऱ्या एसटीने पाठमागून धक्का द्यावा लागला, त्यानंतर ती एसटी अहमदपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. सध्या उन्हाची तीव्रता वाढत चालली असून, जागोजागी एसटी बंद पडत असल्यामुळे चालकांसोबतच प्रवाशांची तारांबळ उडत आहे. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन एसटी बसची तातडीने दुरुस्ती करून घेण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com