आठवलेच्या सभेत खुर्च्यांची फेकाफेक; बाबासाहेबांच्या नातू विषयी अपशब्द

प्रकाश बनकर
मंगळवार, 15 जानेवारी 2019

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदनावर रिपाई आठवले गटाचा नामविस्तार दिनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमात खुद्द केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार चंद्रकांत खैरे, रिपब्लिकन पक्षाचे (आठवले)गटाचे पदाधिकारी व्यासपिठावर उपस्थित होते.

औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या25 व्या नामविस्तार दिनानिमित्ताने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सभेत बाबासाहेबांच्या नातू विषयी अपशब्द वापरल्यामूळे कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची तोडफोड करीत सभा उधळण्याचा प्रयत्न सोमवारी (ता.14) रात्री नऊ वाजेच्या सुमारास झाला. 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदनावर रिपाई आठवले गटाचा नामविस्तार दिनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमात खुद्द केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार चंद्रकांत खैरे, रिपब्लिकन पक्षाचे (आठवले)गटाचे पदाधिकारी व्यासपिठावर उपस्थित होते. रिपाइंचे मराठवाडा अध्यक्ष मिलिंद शेळके यांनी भाषण करताना बाबासाहेबांच्या नातू विषयी अपशब्द वापरले. ते म्हणाले, नामांताराच्या लढ्यात व खैरलांजीचे प्रकार झाल्यानंतर हे कुठचे दिसली नसल्याचे शेळके यांनी आपल्या भाषणात म्हटले.

या यासह बाबासाहेबांच्या नातूना चोर म्हणाले,या वरून सभेत आलेल्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत खुर्च्याची तोडफोड करीत सभा उधळण्याचा प्रयत्न केला. यामूळे काही काळ गोंधळ उडाला होता. मात्र पक्षाचे नेते बाबुराव कदम यांनी पुढाकार घेत कार्यकर्त्यांना शांत केले. त्यानंतर पुढील कार्यक्रम झाला. कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, नेत्यांनी समाजातील कोणत्याही नेत्याच्या टीका करून करायला नकोत अशा सुचना केल्या. 

Web Title: Ramdas Athwale rally in Aurangabad