रामदास कदमांनी मला पाडण्यासाठी कट-कारस्थान केले: अनंत गीते

माधव इतबारे
शुक्रवार, 8 जून 2018

औरंगाबाद - पुत्रप्रेमापोटी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत मला पाडण्यासाठी कट-कारस्थान केले, असा आरोप शिवसेनेचे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी शुक्रवारी (ता. आठ) शिवसेनेच्या येथील जिल्हा मेळाव्यात केला. आम्हा दोघांतील वाद आता मिटला असून, त्यांच्या मुलाला दापोलीतून आमदार करण्याची मी शपथ घेतली आहे. माझा आदर्श ठेवून प्रत्येक शिवसैनिकाने आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीत मतभेद विसरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वबळावर सत्ता आणण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेच्या वर्धापनदिनानिमित्त शुक्रवारी जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज नाट्यमंदिरात मेळावा आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे, महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख ऍड. मनीषा कायंदे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, आमदार संदीपान भुमरे, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी आदी उपस्थित होते. पुढे गिते म्हणाले, गेल्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट होती. या लाटेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निधड्या छातीने उभे राहिले व 63 जागा जिंकून आणल्या. या वेळी सत्ताबदल झाल्याशिवाय राहणार नाही. मतभेद विसरून स्वबळावर सत्ता आणण्यासाठी त्यांनी शिवसैनिकांना यावेळी शपथ दिली. शिवसैनिक कसा असावा, याचे मी स्वतःचे उदाहरण देतो, असे सांगत लोकसभा निवडणुकीत माझा पराभव करण्यासाठी स्वपक्षाचे रामदास कदम यांच्यासह जयंत पाटील, सुनील तटकरे यांनी 200 कोटी रुपये खर्च केले. मात्र, दोन हजार मतांनी मी जिंकलो. त्यानंतर रामदास कदम स्वतः माझ्याकडे आले व या वादावर पडदा पडला, असे गिते यांनी नमूद केले.

खुर्चीवरून मानापमान नाट्य
गीतेंच्या भाषणापूर्वी खुर्चीवरून मानापमान नाट्य घडले. आमदार संजय शिरसाट यांनी व्यासपीठावर न येता शिवसैनिकात बसण्याचा निर्णय घेतला. आपली खुर्ची वेगळ्या बाजूला ठेवण्यात आली होती व मान्यवरांमध्ये आपले नाव घेतले नसल्याचे त्यांचे म्हणणे होते, असे सांगण्यात आले. याबद्दल अधिक बोलण्यास शिरसाट यांनी नकार दिला.

Web Title: Ramdas kadam stepped up a plot to demolish me: Anant Geete