'पवारसाहेब, 'आम्ही तुमच्यासोबतच''

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

राणा पाटील अन् राहूल मोटे यांनी घेतली पवारांची भेट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत असताना पक्षाचे नेते आणि माजी राज्यमंत्री राणा पाटील आणि राहूल मोटे यांनी आज पक्षप्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. सोबतच ते राष्ट्रवादीत राहणार असल्याचीही घोषणा त्यांनी केली आहे.

कळंब-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांणा काही दिवसांपासून उधाण आले होते. त्यांनंतर त्यांनी आज मुंबईमध्ये जाऊन शरद पवार यांची भेट घेत स्पष्ट केले की, ते राष्ट्रवादीसोबतच राहणार असून पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा कुठलाही विचार नाही.

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडले असून पक्षातील अनेक नेते पक्ष सोडून भाजप शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आतापर्यंत अनेक विद्यमान आमदारांसह महत्वाच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rana patil and rahul mote meets Sharad Pawar