आत्महत्यग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या घरी दानवे - Video 

Nanded News
Nanded News

अर्धापूर (जि. नांदेड) : नांदेड जिल्हा दाैऱ्यावर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे शनिवारी (ता. १६) सकाळी नांदेडला उतरल्यावर त्यांना अर्धापूर तालुक्यातील खैरगाव येथील एका शेतकऱ्याने तीन दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याचे समजताच त्यांनी सुरवातीला खैरगाव गाठून आत्महत्यग्रस्त शेतकऱ्याच्या कुटंबाची भेट घेत सांत्वन केले.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. शासनाचे हमी भाव खरेदी केंद्र व कापूस खरेदी केंद्र लवकरच सुरू करण्यात येतील. परतीच्या पावसाने खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या वेळी दिली. श्री.दानवे यांनी खैरगाव येथील शेतकऱ्याने कर्ज व नापिकीला कंटाळून तीन दिवसांपूर्वी आत्महत्या केली. या कुटूंबाचे सांत्वन करून दानवे यांनी शेतकऱ्यांशी शनिवारी (ता.१६) संवाद साधला. तसेच परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली.

खैरगाव येथील शेतकरी आनंदा बालाजी कल्याणकर (वय ४५) यांनी कर्ज व नापिकीला कंटाळून आत्महत्या केली होती. या शेतकरी कुटूंबाला राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भेट देवुन सांत्वन केले. त्यांच्यासोबत खासदार प्रताप पाटील चिखलीकर,  आमदार राम पाटील रातोळीकर, तुषार राठोड, राजेश पवार, संतुक हंबर्डे, जिल्हा परिषद सदस्य बबनराव बारसे, उपसभापती डाॅ.लक्ष्मण इंगोले, अॅड.किशोर देशमुख, सुधाकर कदम, निलेश देशमुख तहसीलदार सुजित नरहरे, सरपंच तलाबाई मुंगल, मंडळ अधिकारी संजय खिल्लारे, तलाठी रूपाली जडे, कृष्णा इंगोले, संतोष मुंगल, दत्ता नादरे, आनंद सोळंके, बालाजी स्वामी, बाबुराव लंगडे, सुनील शिंदे, योगेश हाळदे, अवधुत कदम उपस्थित होते. 

शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफी, शेतमाल हमी भाव खरेदी केंद्र सुरु करणे, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट तात्काळ मदत देणे,  पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या आटी शितल करणे आदी व्यथा दानवे यांच्यासमाेर मांडल्या.

देशभरात ८१ कोटी नागरिकांना रास्त भावाने गहू व तांदूळ

मराठवाड्यातील आठ व विदर्भातील सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तीन रूपये किलो तांदूळ व दोन रूपये गहू देण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला सहा हजार जमा करण्यात येत आहेत. तिजोरीत पैसा वाढल्यावर रकमेत वाढ करण्यात येईल. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. तसेच देशभरात ८१ कोटी नागरिकांना रास्त भावाने गहू व तांदूळ देण्यात येत आहेत. 

विम्यासाठी कृषी कार्यालयात तक्रारी कराव्यात

परतीच्या पावसाने झालेल्या नुकासानीचे सर्वेक्षण करण्यात येत आहेत. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. नुकसानीचा अंतिम आहवाल प्राप्त झाल्यावर शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदतीसाठी दहा हजार कोंटीची तरतूद केली आहे. विम्यासाठी कृषी कार्यालयात तक्रारी कराव्यात अशी माहिती श्री.दानवे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com