Gopinath Munde Death Anniversary : 'मुंडेंसाहेबांनी तेव्हा फक्त स्लीपरचा पट्टा विकत घेतला'

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 3 जून 2019

गोपिनाथ मुंडे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त परळीमधील गोपिनाथगड येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी गोपिनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

परळी(बीड): गोपिनाथ मुंडे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त परळीमधील गोपिनाथगड येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी गोपिनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

दानवे म्हणाले की, प्रचार करत असताना गोपिनाथ मुंडे साहेब कधीच थकले नाहीत, थांबले नाहीत. पक्षाच्या वाढीसाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले. जुन्या आठवणींना उजाळा देताना दानवे सांगतात की, जुन्या काळात स्लीपर घालण्याची पद्धत होती. एकवेळेस साहेबांची स्लीपर तुटली पण त्यांनी पैशाअभावी नवी स्लीपर विकत न घेता केवळ स्लीपरचा पट्टा विकत घेतला. संघर्षयात्रेच्याही आठवणींना यावेळी दानवेंनी उजाळा दिला.

दरम्यान, गोपिनाथ मुंडे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त परळीमधील गोपीनाथगड येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला व बालकल्याणविकास मंत्री पंकजा मुंडे तसेच बीड लोकसभा मतदारसंघाच्या खा. प्रितम मुंडे उपस्थित आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raosaheb Danwe highlighted the memories of Gopinath Munde on Gopinath Munde Death Anniversary