सात वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून पळून जाणार्‍यास अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

सेलू (जि. परभणी) : धनेगाव येथील एका सातवर्षीय बालिकेवर अत्याचार करून मुंबईला पळून जाण्याच्या बेतात असलेल्या अारोपीला सेलू पोलिसांनी मंगळवारी (ता. १७) रोजी रात्री परभणी येथील बसस्थानकातून जेरबंद केले.गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासातच अारोपील ताब्यात घेतले.

धनेगाव ( ता.सेलू ) येथील इयत्ता दूसरीमध्ये शिकत असलेल्या सात वर्षीय बालिकेवर माझ्या घरात ये तुला टी.व्ही.लावून देतो असे अामिष दाखवून अमोल भालेराव ( वय २०) याने बालिकेवर अत्याचार केला.

या प्रकरणी पिडीत बालिकेच्या पित्याने मंगळवारी सेलू पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली होती. साफळा रचून परभणी येथील बसस्थानकातून आरोपी अमोल भालेराव यास ताब्यात घेतले.

Web Title: Rape accused arrested in Parbhani