एमआयएमच्या 'त्या' नगरसेवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 जानेवारी 2019

औरंगाबाद - श्रद्धांजली प्रकरणानंतर प्रकाशझोतात आलेला व एमआयएममधून हकालपट्टी झालेल्या नगरसेवक सय्यद मतीनविरुद्ध बलात्काराच्या गुन्ह्याची सिटी चौक पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. 15) गुन्ह्याची नोंद झाली. एका महिलेला नोकरी लावून देण्याचे तसेच लग्नाचे आमिष दाखवत त्याने अत्याचार केल्याची माहिती पोलिस निरीक्षक दादासाहेब शिनगारे यांनी दिली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, रशीदपुरा येथील महिला कौटुंबिक कारणामुळे पतीपासून वेगळी राहते. आधार कार्ड बनविण्यासाठी ती एक वर्षापूर्वी नगरसेवक सय्यद मतीनच्या कार्यालयात गेली होती. मतीनने तिला आधार कार्ड बनवून नोकरी मिळवून देतो, लग्न करतो, असे आमिष दाखवून तिच्याशी जवळीक वाढविली. यानंतर तिच्याशी लगट करून रशिदपुरा तसेच टाऊन हॉल परिसरातील घरात त्याने महिलेवर अत्याचार केला. याची वाच्यता केल्यास त्याने ठार मारण्याचेही महिलेला धमकावले. त्यामुळे सुरवातीला महिलेने घडलेल्या प्रकाराबाबत कुणालाही सांगितले नाही. परंतु, मतीनकडून लग्नास नकार मिळाल्याने तिने पोलिस आयुक्तालयात मतीनविरुद्ध बलात्काराचा आरोप करून तक्रार केली. या प्रकरणात मतीनविरुद्ध महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, सिटी चौक पोलिस ठाण्यात नगरसेवक सय्यद मतीन सय्यद रशिदविरुद्ध बलात्काराच्या आरोपाखाली गुन्ह्याची नोंद झाली. 

पीडितेने केली होती  वरिष्ठांकडे तक्रार 
मतीनने एका तरुणीला पळवून नेल्याच्या प्रकाराची चर्चा संपत नाही की लगेचच अन्य एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्काराचे प्रकरण समोर आले. पहिल्या प्रकरणाची माहिती समजल्यानंतर पीडित महिलेने पोलिस आयुक्तांची भेट घेऊन अत्याचाराचा पाढा वाचला, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

वादग्रस्त कारनामे 
सभागृहात महापौरांवर खुर्च्या भिरकावणे, अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली सभेत वादग्रस्त विधान करणे, "वंदे मातरम्‌'ला विरोध आदी कारणांमुळे सय्यद मतीन चर्चेत आला होता. त्याच्या इतरही कारनाम्यांमुळे त्याच्याविरुद्ध एमपीडीएची कारवाई करण्यात आली होती; परंतु नंतर ही कारवाई रद्दबातलही ठरली. 

Web Title: Rape case against corporator matin