अल्पवयीन मुलीचा अपहरण करणाऱ्या तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

पाचोड (जि.औरंगाबाद) ः गेल्या दीड महिन्यापूर्वी चौदावर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून अपहरण केलेल्या तरुणास पाचोड (ता. पैठण) पोलिसांनी "त्या' मुलीसह मोठ्या शिताफीने नागपूर येथून ताब्यात घेऊन तरुणाविरुद्ध बलात्काराचा सोमवारी (ता. 30) गुन्हा दाखल करून अटक केली. दादेगाव हजारे (ता. पैठण) येथील इम्रान निजाम पठाण (वय 20) याने गावातील चौदावर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिचे ता. 18 ऑगस्ट रोजी अपहरण केले होते.

पाचोड (जि.औरंगाबाद) ः गेल्या दीड महिन्यापूर्वी चौदावर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून अपहरण केलेल्या तरुणास पाचोड (ता. पैठण) पोलिसांनी "त्या' मुलीसह मोठ्या शिताफीने नागपूर येथून ताब्यात घेऊन तरुणाविरुद्ध बलात्काराचा सोमवारी (ता. 30) गुन्हा दाखल करून अटक केली. दादेगाव हजारे (ता. पैठण) येथील इम्रान निजाम पठाण (वय 20) याने गावातील चौदावर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिचे ता. 18 ऑगस्ट रोजी अपहरण केले होते.

यासंबंधी सदर मुलीच्या पित्याने इम्रान पठाण याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. पोलिसांनी "त्या' मुलीसह इम्रानचा सर्वत्र कसून शोध घेतला. त्याच्या मोबाईल लोकेशनवरून ते दोघे अकोला येथे असल्याचे समजल्याने पोलिसांनी अकोल्याला जाऊन त्यांची पडताळणी केली, मात्र त्यानंतर ते सतत मोबाईल क्रमांक बदलत असल्याने शोध घेणारे पोलिस हतबल झाले. अखेर या प्रकरणावर पडदा पडतो की काय, अशी शंका निर्माण झाली. परंतु, इम्राम याने नागपूर येथील एका दुकानदाराच्या मोबाईलने गावातील त्याच्या मित्रास संपर्क साधल्याने पोलिसांना धागेदोरे मिळाले. पोलिसांनी संबंधित संशयित क्रमांकाचे लोकेशन तपासले असता तो क्रमांक नागपूर येथील असल्याचे समजले.

पैठणचे सहायक पोलिस अधीक्षक गोरख भामरे व सहायक पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गोरख खरड, रमेश जारवाल, मुलीच्या स्थानिक नातेवाईकांचे एक पथक नागपूरला पाठविले. तेथे गेल्यावर नागपूर पोलिसांच्या सहकार्याने संबंधित मोबाईल क्रमांकाचे लोकेशन घेतले असता ते उभे असलेल्या ठिकाणापासून जवळपासचा क्रमांक असल्याचा संदेश मिळाला. पोलिसांनी संबंधित मोबाईलधारकास ताब्यात घेऊन इम्रान संबंधी विचारपूस केली असता तो येथील हॉटेलवर काम करीत असून खोली करून ते दोघेजण पती-पत्नी राहत असल्याचे सांगितले. "त्या' व्यक्तीने इम्रान काम करीत असलेल्या हॉटेलवर पोलिसांना नेले.

समोरून येत असलेल्या इम्रानला "त्या' मुलीच्या नातेवाइकांनी ओळखले, तोच पोलिसांनी त्यास तब्बल दीड महिन्यानंतर अलगद पकडले. त्यानंतर इम्रानने पोलिसांना भाड्याने केलेल्या त्याच्या खोलीवर नेले. तेथे पोलिसांनी "त्या' मुलीलाही ताब्यात घेतले व त्या दोघांना घेऊन ते सोमवारी (ता. 30) पाचोडला आणले. दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मुलीचे अल्पवय व वैद्यकीय अहवालावरून पोलिसांनी तब्बल दीड महिन्यानंतर इम्रान विरुद्ध अपहरण व बलात्काराचा गुन्हा नोंदवून त्यास गजाआड केले. इम्रानच्या मुसक्‍या आवळल्याने पोलिस उपनिरीक्षक गोरक्ष खरड व त्यांच्या सहकार्याचे दादेगावच्या ग्रामस्थानी अभिनंदन केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rape Case Filed Against Youth