विद्यार्थीनीचा विनयभंग, तिघांवर गुन्हा दाखल 

crime_women
crime_women

नांदेड : महाविद्यालय व खाजगी शिकवणीला जाणाऱ्या एका विद्यार्थिनीला रस्त्यात गाठून तिचा विनयभंग करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हडको परिसरात राहणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीची रस्त्याने ये- जा करतांना तिला त्याच भागातील काही आंबटशौकीन तरून छेड काढीत. तीने त्या युवकांना समजावून सांगितल्यानंतरही त्यांच्या वागण्यात बदल होत नव्हता. हा प्रकार तीने आपल्या पालकांना सांगितला. त्यांनीही या टवाळखोरांचा बंदाेबस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते काही एेकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आमच्यासोबत जर नाही बोलली तर तुझे लग्न कसे होते ते आम्ही पहातो. अशी तिला धमकी देत. ते एवढ्यावरच न थांबता सोमवारी (ता. 15) सायंकाळच्या दरम्यान तिच्यासोबत धक्काबुक्की केली. या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पिडीत विद्यार्थीनीनी नांदेड ग्रामिण पोलिस ठाणे गाठले. तिच्या तक्रारीवरून रोडरोमियो संकेत संजय काळेवाड, नागेश काळेवाड आणि संजय काळेवाड यांच्याविरूध्द विनयभंदाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार पी. सी. जाधव हे करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com