तब्बल 23 दिवस डांबून अल्पवयीन मुलीवर बलात्कार 

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.

जालना - हिंगोली जिल्ह्यातील एका शेतात तब्बल 23 दिवस डांबून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (ता.सहा) रात्री उघडकीस आली आहे. या प्रकरणी चंदनझिरा पोलिसांनी शुक्रवारी (ता.सहा) रात्री उशिरा हिंगोली जिल्ह्यातून एकास तर चंदनझिरा परिसरातून दोन महिलेसह अशा तिघांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक श्‍यामसुंदर कौठाळे यांनी दिली. दरम्यान, य प्रकरणातील अन्य एक संशयित फरारी असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

जालना शहरातील चंदनझिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुंदरनगर येथील अल्पवयीन मुलगी ता. 13 नोंव्हेबर रोजी बेपत्ता झाली होती. या प्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल होती. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांसमोर दोन ते तीन संशयितांची नावे पुढे आली. त्यामुळे पोलिसांनी या संशयितांवर पाळत ठेवण्यास सुरवात केली. या संशयितांचा पाठलाग करणे सुरू केला. त्यानंतर शुक्रवारी (ता.सहा) या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील एका शेतात डांबल्याचे आढळले. तेथे या मुलीवर बलात्कार झाल्याचेही तपासात पुढे आले. या पिडीत मुलीची सुटका चंदनझिरा पोलिसांनी सुटका केली.

या प्रकरणी तीन संशयितांना चंदनझिरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात दत्ता यादव धनगर (रा. सेनगाव, जि. हिंगोली), दोन महिलांचा समावेश आहे. तर या प्रकरणातील अन्य फरारीचा शोध पोलिस घेत आहेत. 

विकण्याचा होता डाव 
अल्पवयीन मुलीला तिच्याच घराशेजारी दोन महिलांनी संगनमत करून पळविल्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील दत्ता धनगर याच्या शेतात तब्बल 23 दिवस डांबण्यात आले. तेथून या मुलीला विकण्याचा डावही संशयितांनी आखला होता. मात्र पोलिस प्रशासनाच्या दक्षतेमुळे हा डाव उधळला गेला, शिवाय मुलीची सुटकाही झाली. सध्या या पिडित अल्पवयीन मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com