जळकोटमध्ये मेंढ्यांसह रास्ता रोको

शिवशंकर काळे
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

धनगर समाजाचा अनुसूचीत जमातीत समावेश करावा, या मागणीसाठी तालुका धनगर समाज कृती समितीच्या वतीने सोमवारी (ता. 13) शहरातील कुणकी चौकात मेंढ्यासह शांततेत रस्तारोको करण्यात आला.
 

जळकोट (जि. लातूर) : देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष झाली तरीही धनगर समाजाला न्याय मिळाला नाही. धनगर समाजाचा अनुसूचीत जमातीत समावेश करावा, या मागणीसाठी तालुका धनगर समाज कृती समितीच्या वतीने सोमवारी (ता. 13) शहरातील कुणकी चौकात मेंढ्यासह शांततेत रस्तारोको करण्यात आला.

सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर, महात्मा फुले, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून मोर्चाला सुरवात झाली. शिवाजी चौक ते कुणकी चौकापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर कुणकी चौकात सकाळी अकरा ते  दुपारी एक दरम्यान रस्तारोको करुन शासनाचा निषेध करण्यात आला. या वेळी आंदोलनकर्त्यांनी आंदोलनामागील भूमिका स्पष्ट करून तहसिलदार डॉ. शिवनंदा लगडापुरे यांना मागण्यांचे निवेदन दिले व आंदोलनाचा समारोप केला.

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Rasta Roko Agitation With Sheeps At Jalkot Latur For Dhangar Reservation