जालन्यात ओबीसी राजकीय आरक्षणासाठी रास्तारोको आंदोलन

स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले होते. या संदर्भात राज्य शासनाने पूनर्विचार याचिका दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती
jalna
jalnajalna

जालना: स्थानिक स्वराज्य संस्थेतील रद्द करण्यात आलेले राजकीय ओबीसी आरक्षण (obc political reservation) पूर्ववत करावे, या मागणीसाठी सोमवारी (ता.२१) अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदच्या वतीने शहरातील अंबड-चौफुली येथे रस्तारोको आंदोलन केले. या आंदोलनात इतर पक्षांचे ओबीसी नेतेही सहभागी झाले होते.

स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले होते. या संदर्भात राज्य शासनाने पूनर्विचार याचिका दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. यानंतर ओबीसी नेत्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसीचे रद्द करण्यात आलेले राजकीय आरक्षण पूर्ववत करावे, ओबीसीची जात नियाह जनगणना करावी अशी मागणी सोमवारी (ता.२१) अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदच्या वतीने रास्तारोको आंदोनल करण्यात आले.

jalna
६०० कोटींची घोषणा, तरी एसटी कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षाच

या आंदोलनात इतर पक्षांचे नेते सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी विविध घोषणा दिल्या. दरम्यान या रस्तारोको आंदोलनामुळे अंबड-चौफुली मार्गाच्या चारही बाजुंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही वेळानंतर पोलिसांनी आंदोलकांना रस्त्यावरून दूर करता वाहतूक सुरळीत केली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com