परभणी - गंगाखेड येथे प्रहार जनशक्ती पक्षाचा रास्तारोको

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

गंगाखेड (परभणी) : देशव्यापी शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गुरुवारी (ता. 7) परळी- गंगाखेड राज्यमार्गावर एक तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले.                                                            

गंगाखेड (परभणी) : देशव्यापी शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गुरुवारी (ता. 7) परळी- गंगाखेड राज्यमार्गावर एक तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले.                                                            

शेतकरी समविचारी संघटनानी राष्ट्रीय किसान महासंघाने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी देशव्यापी संप सुरू आहे. या संपाच्या समर्थनार्थ प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने राज्यमार्गावर एक तास रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी परळी गंगाखेड रोड रस्त्यावरी वाहतुक एक तास खोळबल्याने दोन्ही बाजुने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांना आंदोलनकर्त्यांनी मागण्याचे निवेदन देऊन रास्ता रोको आंदोलनाची सांगता केली.

Web Title: rastaroko at gangakhed of prahar janshakti party