मराठा समाजाच्या वतीने रस्तारोको आंदोलन

rastaroko
rastaroko

मालेगाव (नांदेड) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता मालेगाव येथील छत्रपती शिवाजी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अनेक आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता राष्ट्रीय महामार्ग क्र. 222 वर मालेगाव येथील छत्रपती शिवाजी चौकात मराठा समाजाच्या वतीने रस्तारोको आंदोलन करण्यात आले. यात मराठा समाजाला तत्काळ आरक्षण देण्यात यावे,फडणीस सरकार मुडदाबाद,  एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी सरकारला इशारा देण्यात आला. तत्काळ मराठा सामाजाला आरक्षण न दिल्यास आणखी तिव्र स्वरूपाचे आंदोलन गनिमी काव्याने करण्यात येणार असल्याचेही संयोजकाच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी पवन पाटील, गजुभाऊ इंगोले, दशरथ कदम, रामकृष्ण कदम, गजानन इंगोले, बालाजी कदम, प्रमोद इंगोले, देवा इंगोले, दिनेश कदम, संतोष कदम, सचिन इंगोले, अमोल इंगोले यासह मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नेये यासाठी अर्धापूरचे पोलीस निरीक्षक मांजरमकर यांच्यासह पोलीस प्रशासनानेही सहकार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com