नांदेड-चंदीगड विमान भाडे पुन्हा कमी

air-india
air-india

नांदेड : नांदेड- दिल्ली नंतर आता नांदेड- चंदीगड ही एअर इंडीयाची विमान सेवा आठ जानेवारीपासुन प्रारंभ होत आहे. या विमानसेवेच्या भाड्यात कपात करत विमान प्रशासनाने पंधरा दिवस अगोदर बुकींग करणाऱ्यांना तिकीट दर कमी केले आहेत. दर १८९४, २४१९, ३१५४, ३९९४ आणि ५०४४ रुपये असे दर आकारण्यात आले आहेत. अशी माहिती स्टेशन व्यवस्थापक गजेंद्र गुटे यांनी सांगितले आहे.

येथे श्री गुरूगोविंदसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात आल्यानंतर नांदेड- मुंबई, नांदेड- हैद्राबाद, नांदेड- अमृतसर तसेच नांदेड- दिल्ली विमान सेवेला प्रारंभ झाला. सद्यस्थितीत नांदेड- दिल्ली विमानसेवेला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान एअर इंडीया कंपनीने नांदेड- चंदीगड ही विमान सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला असून आठ जानेवारी रोजी या विमान सेवेला प्रारंभ होणार आहे. यासाठी सचखंड गुरूद्वारा बोर्डांनी प्रयत्न केले होते. या विमान सेवेमुळे चंदीगडसह पटीयाला, श्रीआनंदपुर साहिब, शिमला, हिमाचल प्रदेश, उत्तरांचल व हरीयाणा आदी राज्यातील प्रवाशांना फायदा होणार आहे. 

सदर विमान सेवा आठवड्यातील मंगळवारी व बुधवारी उपलब्ध राहणार आहे. १२२ आसनसीट असलेले विमान चंदीगड येथून सकाळी ९.१० वाजता उड्डाण घेणार असून नांदेड विमानतळावर ११.३० वाजता उतरणार आहे. तसेच नांदेड विमान तळावरुन दुपारी १२.०५ वाजता उड्डाण घेतलेले विमान दुपारी २.२० वाजता चंदीगड विमानतळावर उतरणार आहे. प्रवास भाड्यात पुन्हा कपात केल्याने याचा फायदा प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन गजेंद्र गुटे यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com