राशन दुकानात बायोमेट्रिक बंधनकारक.! मुदत संपली, कोरोना संसर्गाचा धोका

3Biometric_0.jpg
3Biometric_0.jpg

कळंब (उस्मानाबाद) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेशन दुकानातून लाभार्थ्यांची बायोमेट्रिक पडताळणी न करता दुकानदार किंवा नॉमिनी यांचा पॉश मशीनला अंगठा लावून धान्य वाटप करण्याचे निर्देश ३१ जुलैपर्यंत राज्य शासनाने दिले होते. सध्यातरी शासनाने मुदत वाढ दिली नाही. शासनाने दिलेली मुदत संपल्याने आता लाभार्थ्याना रेशन दुकानातून धान्य घेण्यासाठी बायोमेट्रिक पडताळणी करूनच धान्य मिळणार आहे. त्यामुळे रेशन दुकानातूनच कोरोना संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे. 

कोरोनाचा संसर्ग शहरासह ग्रामीण भागात वाढतच आहे. शासनाने ३१ पर्यत अनलॉकची घोषणा केली. मुदत वाढवून मिळण्यासाठी धान्य दुकानदार संघटनेची शासनासोबत बोलणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णाची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रास्तभाव दुकानातून अल्पदरातील व प्रधानमंत्री गरीब कल्याण कुटूंब योजना अंतर्गत मोफत प्रती सदस्य पाच किलो तांदूळ वितरण करताना लाभार्थ्यांची बायोमेट्रिक पडताळनी न करता रास्त भाव दुकानदारांनी स्वतःचे आधार (नॉमिनी) अधिप्रमाणित करून ३१ जुलै पर्यत धान्य वाटपाची सुविधा उपलब्ध करून दिली होती.

आता मुदत संपली आहे. अद्यापपर्यंत सदरील सुविधेचा राज्य शासनाने मुदतवाढ न दिल्याने यापुढे लाभार्थ्याना बायोमेट्रिक पडताळणी करूनच (अंगठा लावून) धान्य मिळणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना पॉश मशीनवर अंगठा लावल्याशिवाय धान्य मिळणार नाही. त्यामुळे रेशन दुकानातूनच कोरोनाचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे.

सामाजिक अंतराचा प्रश्न उदभवणार

सामाजिक अंतर ठेवणे, तोंडाला मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वारंवार वापर करणे याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार सांगत आहेत. त्यामुळे रेशन दुकानातून धान्य वाटप करताना लाभार्थ्यांची पडताळणी केल्याशिवाय धान्य वाटप करता येणार नाही. तर सामाजिक अंतराचा प्रश्न उदभवू शकतो. 

कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. धान्य दुकानातून धान्य वाटप करताना दुकानदार यांचा अंगठा लावून धान्य वितरण करण्यासाठी शासनाने ३१ जुलै पर्यत मुदत दिली होती. मुदत वाढवून मिळण्यासाठी वारंवार संघटनेकडून पाठपुरावा करावा लागतो. त्यामुळे शासनाने सहा महिन्यासाठी एकदाच मुदत द्यावी. अशी मागणी राहील. 
रविंद्र तवले, तालुकाध्यक्ष, रास्त भाव दुकानदार संघटना

संपादन-प्रताप अवचार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com