दानवे - खडसे भेटीने चर्चेला उधाण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

भोकरदन - माजी मंत्री व भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी रविवारी (ता.2) प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यासोबत बंद खोलीत तब्बल दोन तास "गुफ्तगू' केले.

भोकरदन - माजी मंत्री व भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी रविवारी (ता.2) प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यासोबत बंद खोलीत तब्बल दोन तास "गुफ्तगू' केले.

अचानक झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्क लढविले जात आहेत. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेची भूमिका ही भाजपविरोधी होती. अनेक ठिकाणी शिवसेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत हातमिळवणी केली. या बदलत्या राजकीय समीकरणासोबत राज्यात मुदतपूर्व निवडणुकांची शक्‍यता नाकारता येत नसल्याने भाजपला संघटनपातळीवर मजबूत करण्यासह अन्य पक्षांतील बड्या नेत्यांचे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. त्यामुळे या बैठकीला महत्त्व आले.

बैठकीत मंत्रिमंडळातील बदलाची शक्‍यता, जळगाव जिल्ह्यातील स्थानिक राजकारण आदी मुद्यांवर चर्चा झाल्याचे बोलले जाते. याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या निवासस्थानी काल सायंकाळी सुरू झालेली ही बैठक दोन तास चालली. या वेळी आमदार संतोष दानवे यांच्यासह खडसे यांचे जळगाव जिल्ह्यातील निकटवर्तीय कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: ravsaheb danave eknath khadse discussion