"मशिप्र'च्या अध्यक्षपदी पुन्हा सोळुंके 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या (मशिप्र) केंद्रीय कार्यकारिणीच्या निवडणुकीत अध्यक्षपदी माजी मंत्री प्रकाश सोळुंके, उपाध्यक्षपदी विधान परिषद सदस्य अमरसिंह पंडित यांची, तर सरचिटणीसपदी आमदार सतीश चव्हाण यांची निवड झाली. 

औरंगाबाद : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या (मशिप्र) केंद्रीय कार्यकारिणीच्या निवडणुकीत अध्यक्षपदी माजी मंत्री प्रकाश सोळुंके, उपाध्यक्षपदी विधान परिषद सदस्य अमरसिंह पंडित यांची, तर सरचिटणीसपदी आमदार सतीश चव्हाण यांची निवड झाली. 

देवगिरी महाविद्यालयात सोमवारी सकाळी निवडप्रक्रिया पार पडली. गेल्या अनेक वर्षांपासून मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळावर माजी सरचिटणीस मधुकरराव मुळे यांची सत्ता होती; पण 10 जुलै 2013 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव करून आमदार चव्हाण, सोळुंके, पंडित यांनी वर्चस्व प्रस्थापित केले होते. ते सोमवारी झालेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा सिद्ध झाले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सोळुंके यांना 277, तर त्यांचे विरोधक पानसंबळ यांना केवळ 52 मते मिळाली. उपाध्यक्षपदी पंडित (279) व शेख सलीम शेख अहेमद (277) यांची निवड झाली. सरचिटणीसपदी 280 मते घेऊन चव्हाण, सहचिटणीसपदी प्रभाकर पालोदकर व अनिल नखाते 279, तर कोषाध्यक्षपदाचे उमेदवार अविनाश येळीकर 279 मते घेऊन विजयी झाले. 

Web Title: Re-elected president of MSP