विवाहासाठी यंदा 46 मुहूर्त : पहा कोणते...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

तुळशीविवाहानंतर नोव्हेंबरमध्ये असलेल्या चार मुहूर्तावर विवाह सोहळ्यास सुरवात होईल. यावर्षी नोव्हेंबर ते डिसेंबर या दोन महिन्यात एकूण 11 मुहुर्त असल्याने आत्ताच लगीनघाई सुरु झाली आहे.

औरंगाबाद : दिपावली संपल्यानंतर अवघ्या दहा दिवसांत तुळशीविवाह मुहूर्त सुरु होतात. तुळशी विवाहानंतर लग्नाचा धुमधडाका सुरु होतो. शनिवारपासून (ता. नऊ) मंगळवारपर्यंत (ता. 12) चार दिवस तुळशी विवाह मुहूर्त असल्याने बाजारपेठेत तुळशी विवाहासाठी लागणारे साहित्य विक्रीची वर्दळ सुरु आहे.

औरंगाबादेत साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्त का लावलाय?

दिवाळीनंतर घरात "यंदा कर्तव्य आहे', असे म्हणणाऱ्यांना तुळशी विवाहानंतर अवघ्या सात दिवसानंतर लग्नाचे बाशिंग बांधता येणार आहे. नोव्हेंबरमध्ये वीस तारखेपासून लग्नाचे शुभमुहूर्त आहेत. यंदा डिसेंबरपासून गुरुचा अस्त असल्यामुळे महिनाभर विवाहांसाठी मुहूर्त नाही. कार्तिकी पौर्णिमेला 12 नोव्हेंबररोजी तुलसी विवाहाची समाप्ती होणार आहे. त्यानंतर वीस नोव्हेंबरपासून लग्नतिथीचा योग आहे.

'या' विद्यापीठातील मुलींना कोण देतंय धमकी?

तुळशीविवाहानंतर नोव्हेंबरमध्ये असलेल्या चार मुहूर्तावर विवाह सोहळ्यास सुरवात होईल. यावर्षी नोव्हेंबर ते डिसेंबर या दोन महिन्यात एकूण 11 मुहुर्त असल्याने आत्ताच लगीनघाई सुरु झाली आहे. यंदा मे महिन्यात तब्बल 12 विवाहयोग्य तिथी आहेत. तर जून महिन्यात फक्त तीन मुहुर्त आहेत. त्यामुळे वधू-वरपित्यांना लगीनघाईसाठी मोठी धडपड करावी लागणार आहे. मागील वर्षी 86 मुहूर्त होते. मात्र, यंदा विवाहासाठी फक्त 46 मुहूर्त आहेत. 

साहित्य खरेदीला गर्दी 

तुळशी विवाहासाठी शहरातील बाजारपेठेत सध्या साहित्य विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. त्यात हळदी-कुंकू, बांगड्या, मणी-मंगळसूत्र, ऊस यासह इतर साहित्यही आहे. हे सर्व साहित्य एकत्र करून 15 ते 20 रुपयांत विकले जात आहे. हिंदू संस्कृतीप्रमाणे अनेकजण प्रत्येक वर्षी तुळशीचा विवाह लावतात. सध्याही तुळशी विवाहाची लगबग दिसत आहे. 

Image result for marriage

यंदाचे मुहूर्त 

नोव्हेंबर - 20,21,23,28 
डिसेंबर - 1,2,3,6,8,11,12 
जानेवारी - 18,20,29,30,31 
फेब्रुवारी - 1,4,12,14,16,20,27 
मार्च - 3,4,8,11,12,19 
एप्रिल - 15,16,26,27 
मे - 2,5,6,8,12,14,17,18,19,24 
जून - 11,14,15


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Read 44 Marriage Muhurts this year