हेही वाचा, वसमत तालुका मातृत्व वंदना योजनेत अव्वल

pmmvy-photo
pmmvy-photo

वसमत ः प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेतून दोन हजार ९९१ गरोदर माता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात एक कोटी २५ लाख ४९ हजार रूपये जमा करण्यात आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील देशमुख यांनी दिली. प्रत्येक गावातील आशा स्वंयसेविका व आरोग्यसेविका यांच्या मदतीने गरोदर मातांना या योजनेची माहिती देऊन त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यात येत आहे.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजने अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातून सर्वाधिक वसमत तालुक्यातील तीन हजार ५१८ गरोदर मातांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी दोन हजार ९९१ गरोदर मातांना लाभ मिळाला आहे. या योजने अंतर्गत प्रत्येक महिला लाभार्थींच्या बँक खात्यात एकूण तीन टप्प्यामध्ये पाच हजार रूपयांप्रमाणे जवळपास एक कोटी २५ लाख ४९ हजार रुपयांची रक्कम लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.

अशी आहे नोंदणी प्रक्रीया

देशभरात एक जानेवारी २०१७ पासून पंतप्रधान मातृत्व वंदना योजना सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत माता व बालकांच्या आरोग्याविषयी अटींची पूर्तता करावी लागते. यामध्ये पहिल्यांदा गरोदर राहण्याऱ्या मातेच्या बँक खात्यात पाच हजार प्रोत्साहन स्वरुपात जमा केले जातात. ग्रामस्तरावर आशा व आरोग्य सेविका यांच्यामार्फत लाभार्थींचे अर्ज भरुन घेतले जातात व प्राथमिक आरोग्य केंदातील वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत प्रमाणित करुन घेतली जाते. या अर्जांची तालुकास्तरावर नोंदणी केली जाते. त्यानंतर शासनस्तरावरून सदरील गरोदर मातेच्या खात्यावर योजनेचा लाभ जमा केल्या जातो.

दोन हजार ९९१ गरोदर मातांना लाभ

वसमत तालुक्यातील स्थिती पाहता वसमत तालुक्यात आजपर्यंत दोन हजार ९९१ गरोदर मातांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्र व एक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत गरोदर मातांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी पाच हजार जमा करण्यात आले.

तीन टप्‍प्‍यात मिळतो लाभ

या योजने अंतर्गत नोंदणी करणाऱ्या गरोदर व स्तनदा माता यांना तीन टप्प्यात गरोदर मातांनी शासकीय आरोग्य संस्थेमध्ये नोंदणी केल्यानंतर एक हजार रुपये, दुसऱ्या टप्प्यात गरोदर मातेचे पूर्ण लसीकरण शासकीय आरोग्य संस्थेत झाल्यावर दोन हजार व तिसऱ्या टप्प्यात प्रसूतीपश्चात जन्मलेल्या बालकाला शासकीय आरोग्य संस्थेमध्ये तिसरा डोस दिल्यानंतर दोन हजार देण्यात येतात. 

योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वसमत तालुक्यात प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे.शहरी भागात मोहिमेच्या जनजागृतीसाठी अमन सेवाभावी संस्थेने प्रयत्न केले आहेत.
-डॉ. सुनील देशमुख. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com