कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्त्यावर गडांतर - कुठे ते वाचा 

file photo
file photo

नांदेड : जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष तथा आरोग्य व अर्थ समितीच्या सभापती पद्मा नरसारेड्डी सतपलवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता.२०) आरोग्य समितीची बैठक झाली. उपाध्यक्षा, सभापती सौ. सतपलवार यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेत सुरळीत आरोग्य सेवेसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्त्या रद्द करण्याचे आदेश दिले. 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीची बैठक गुरुवारी उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती सौ. सतपलवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निजी कक्षामध्ये झाली. जिल्हा परिषद सदस्य दिवाकर सुरकुंटवार, केरबा सुर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्या प्रणिता बंदखडके, महालनबाई भुजबळ, सुरेखा आडे यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

पहिल्याच बैठकीत कामाचा धडाका
पदभार घेतल्यानंतर उपाध्यक्षा व सभापती सौ. सतपलवार यांच्या कार्यकाळातील पहिल्याच बैठकीत त्यांनी आरोग्य विभागाचा आढवा घेवून नागरिकांच्या तत्पर आरोग्य सेवेसाठी सूचना दिल्या. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत रुग्ण शोध मोहिम जिल्हाभरात प्रभावीपणे राबविण्याचे यंत्रणेला आदेश दिले. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये औषधांची कमतरता भासणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या.
 
गर्भवती महिलांना कागपत्रांसाठी मदत करा
प्रधानमंत्री मातृत्व वदना योजने अंतर्गत गर्भवती महिलांना शासकीय मानधन मिळण्यासाठी आधार कार्डसह अवश्यक कादपत्रांसाठी अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. आरोग्य सेवकांनी सकारात्मक भावनेने गर्भवती महिलांना कागदपत्रांसाठी अवश्यक मदतीचे आदेश जारी करण्याच्या सुचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्री. शिंदे यांना दिले.

‘कोरोना’ गावपातळीवर जागृती
‘कोरोना’ आजाराबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रासह गावपातळीवर याबाबत जागृती अभियान राबवून नागरिकांना सूचना फलकाद्वारे खबरदारीच्या उपाययोजना सुचवण्याचा ठराव घेण्यात आला. दरम्यान, प्रतिनियुक्त्या रद्द करुन आरोग्य कर्मचाऱ्यांना नियुक्तीच्या ठिकाणी कर्तव्य बजावण्यासाठी नोटीस बजावण्यात यावी, याशिवाय मुख्यालयी निवासाच्या सभापती सौ. सतपलवार यांच्या मुद्दयावर सभागृहाने सहमती दर्शऊन प्रशासनाला आदेश दिले.

आरोग्य संस्थांचा कालाबद्ध आराखडा
प्राथमिक आरोग्य, उपकेंद्र इमारातीच्या दुरुस्तीसाठी कालबद्ध आराखडा तयार करण्याचा ठरावही या वेळी घेण्यात आला. त्यानुसार आवश्यक त्या आरोग्य केंद्रांच्या भौतिक सुविधांमध्ये वाढ होवून आरोग्य सेवा तत्पर मिळण्यास मतद होईल. नागरिकांना तत्पर आरोग्यसेवेसाठी यंत्रणेने पर्यायी उपाय योजनांची चोख आंमलबजाणी करण्याच्या सूचना बैठकीत उपाध्यक्षा, सभापती सौ. सतपलवार यांनी दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com