मध्यावधीसाठी निवडणुकीसाठी कॉंग्रेस तयार - चव्हाण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - शिवसेना आणि भाजप हे सत्ताधारी पक्ष एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. शिवसेनेने तर सरकारमधून बोहर पडण्याची धमकी दिल्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुकीची चर्चादेखील सुरू झाली आहे. मात्र त्याआधी शिवसेनेने सरकारमधून बाहेर पडणे महत्त्वाचे आहे. शिवसेनेने पाठिंबा काढला, तर इतर पक्ष मिळून सरकार स्थापनेची शक्‍यता किंवा सध्या तरी असा पर्याय दिसत नाही. शिवसेनेला कॉंग्रेसने पाठिंबा देण्याचा तर प्रश्‍नच नाही. अशावेळी मध्यावधी निवडणुका झाल्या तर त्यासाठी कॉंग्रेस पूर्णपणे तयार असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. 

""खोटी आश्‍वासने देऊन 2014 मध्ये भाजप केंद्रात व राज्यात सत्तेवर आली आहे. अडीच वर्षांचा त्यांचा कारभार पाहिल्यावर मात्र जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. कुठलीही पर्यायी व्यवस्था न करता, अव्यवहार्यपणे घेतलेला नोटाबंदीचा निर्णय देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणारा ठरला. 40 लाख नोकऱ्या गेल्या. काळा पैसा बाहेर येण्याऐवजी बॅंकाच्या माध्यमातून पांढरा झाला. "कॅशलेश' व्यवहारासंदर्भात अमेरिकेशी केलेला करार आणि त्याद्वारे तेथील क्रेडिट कार्ड कंपन्यांना कमिशन मिळवून देण्यासाठीच नोटाबंदीचा निर्णय मोदी यांनी घेतला असून, आतापर्यंतच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा गैरव्यवहार आहे,'' असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी या वेळी केला. 

काश्‍मीर हातून गेला 
मोदी यांच्या चुकीच्या परराष्ट्र धोरणांमुळे भारताचे पाकशी संबंध बिघडले, काश्‍मीर हातून गेला अशी टीका करतानाच "मेक इन इंडिया' केवळ जाहिरातीतच दिसत असल्याचे चव्हाण म्हणाले. मराठवाड्यातील दुष्काळ हाताळण्यात फडणवीस सरकार अपयशी ठरल्यामुळेच लातूरकरांना पाणी देण्यासाठी त्यांना केंद्राकडे भीक मागावी लागली. मराठवाड्याच्या दुष्काळाची चर्चा जागतिक स्तरावर पोचल्यामुळे कुठलेही मोठे उद्योग इथे यायला तयार नाहीत. ज्यांनी गुंतवणुकीचे आश्‍वासन दिले, त्यांनी परराज्यात कारखाने टाकून उत्पादन सुरू केल्याचे चव्हाण यांनी सांगितले. 

Web Title: Ready for mid-term elections for Congress