esakal | हिंगोली जिल्ह्यात दहा डेडीकेट कोव्हिड हेल्थ सेंटरला मान्यता

बोलून बातमी शोधा

कोविड सेंटर

हिंगोली जिल्ह्यात दहा डेडीकेट कोव्हिड हेल्थ सेंटरला मान्यता

sakal_logo
By
राजेश दार्वेकर

हिंगोली : जिल्ह्यात १० डेडीकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटरला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी मान्यता दिली असून नव्याने २३७ बेड उपलब्ध झाल्यामुळे शासकिय आरोग्य यंत्रणेवरील ताण हलका झाला आहे.

ज्यामध्ये हिंगोली, वसमतमध्ये प्रत्येकी पाच डेडिकेटेड कोव्हीड सेंटरचा समावेश आहे. तसेच कळमनुरीत एका सिसीसी सेंटरला मान्यता देण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चांगलीच वाढत आहे. दररोज किमान २०० पेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. मात्र किमान १५० रुग्णांना सुट्टी मिळत असल्याने आरोग्य यंत्रणेला काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. त्यानंतर रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने औंढा नागनाथ तालुक्यातील सिध्देश्वर प्राथमिक आरोग्य केंद्र तर सेनगाव तालुक्यातील कवठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सीजन बेडची व्यवस्था केली आहे. दरम्यान, हिंगोली शहरातील कोव्हीड शासकिय रुग्णालय व औंढा रोडवरील केंद्रात बेड कमी पडू लागले आहेत. त्यामुळे खाजगी रुग्णालयांना डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरला मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये हिंगोली येथे पाच तर वसमत येथे पाच सेंटरचा समावेश आहे. या ठिकाणी २३७ बेड उपलब्ध होणार आहेत. या शिवाय कळमनुरी येथे ५० बेडच्या कोव्हिड केअर सेंटरला मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढले आहेत. यामुळे शासकिय आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे.

हेही वाचा - वाळकेवाडी येथील राजु शेषराव वाळके (वय २२ ) ह्या तरुणाचा मंगळवारी (ता. २७) रोजी विवाह होणार होता.

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिलेल्या डेडिकेटेड कोव्हीड सेंटरमध्ये हिंगोलीत शास्त्री नगरातील महेश कोव्हीड हेल्थ सेंटर, नारायण नगरातील नाकाडे कोव्हीड हेल्थ सेंटर, पेन्शपुरा भागातील आयकॉन कोव्हीड हेल्थ सेंटर, अजय नगरातील माऊली कोव्हीड हेल्थ सेंटर, तिरुपती नगरातील तिरुमल्ला कोव्हीड हेल्थ सेंटर तसेच वसमत शहरातील आठवडी बाजारातील शिवम कोव्हीड हेल्थ सेंटर, नांदेड रस्त्यावरील पतंगे कोव्हीड हेल्थ सेंटर, मोंढा रस्त्यावरील सातपुते कोव्हीड हेल्थ सेंटर, आठवडी बाजारातील संजीवनी कोविड हेल्थ सेंटर व विवेकानंद सेंटरला कोविड हेल्थ सेंटर या १० जणांचा समावेश आहे. तसेच कळमनुरी येथील अकोला रस्त्यावर जुन्या पेट्रोल पंपाजवळ कोव्हीड हेल्थ सेंटर या सिसीसी केंद्राला मंजुरी देण्यात आली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे