नोकरभरती प्रकरण आले अंगलट 

बाबूराव पाटील
मंगळवार, 26 जून 2018

भोकर (नांदेड) : येथील नगरपालिकेच्या अग्निशमन दलातील चतुर्थश्रेणीच्या कर्मचारी भरती प्रक्रिया करताना बनावट कागदपत्रांच्या आधारे निवड केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून सोमवारी (ता.25) भोकर पोलिसांनी तत्कालिन दोन मुख्याधिकारी व एका माजी नगराध्यक्षासह पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

भोकर (नांदेड) : येथील नगरपालिकेच्या अग्निशमन दलातील चतुर्थश्रेणीच्या कर्मचारी भरती प्रक्रिया करताना बनावट कागदपत्रांच्या आधारे निवड केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून सोमवारी (ता.25) भोकर पोलिसांनी तत्कालिन दोन मुख्याधिकारी व एका माजी नगराध्यक्षासह पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील पालिकेत नव्याने अग्निशमक दलाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. यासाठी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदे भरताना बनावट कागदपत्र घेवून भरती केली असल्याची तक्रार राष्ट्रवादी कॉॅंग्रेस पक्षाच्या नगरसेविका अरुणा विनायक देशमुख यांनी केली आहे. सदरील झालेला प्रकार 15 जानेवारी 2015 ते 7 फेब्रुवारी 2015 दरम्यान करण्यात आला. संगनमत करुन पुर्वनियोजीत कट रचून पदाचा दुरूपयोग केला व शासकीय नियमाचे उल्लंघन आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तक्रारदारांनी न्यायालयात धाव घेतल्याने न्यायालयाने पोलिसांना या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

सोमवारी आरोपी तत्कालिन मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर, तत्कालिन मुख्याधिकारी राहूल वाघ, माजी नगराध्यक्ष विनोद चिंचाळकर, तत्कालिन नगर अभियंता गजानन सावरकर, तत्कालिन पाणी पुरवठा अभियंता श्रीहरी चौंडेकर, तत्कालिन लेखापाल रामसिंग लोहा, फायरमन त्रिरत्न सुरेश कावळे, रमाकांत पंढरीनाथ मरकंडे, संदीप मारोती श्रीरामवार, नागेश व्यंकट चाटलावार, दिलीप नागोराव देवतळे (सेवक), संजय बन्शी पवार, महेश दरबस्तवार, नारायण रामा आलेवाडसह सर्व कर्मचारी असे एकूण 15 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला अाहे. पोलिस उपनिरिक्षक सूर्यवंशी अधीक तपास करीत आहेत.

पालिकेतील नोकर भरती करताना आम्ही नगर परिषद प्रशासन संचालक यांच्या आदेशाने भरती केली आहे. यात काहीही गैरप्रकार केला नाही. राजकीय सुडबुद्धीने आरोप करून बदनाम केले जात आहे. न्यायालयाचा आम्ही आदर करतो. चौकशी झाल्यावर यातील खरे कारण स्पष्ट होईल. 
- माजी नगराध्यक्ष विनोद चिंचाळकर, भोकर 

Web Title: recruitment case come to own