भरती गैरव्यवहाराची सुई पश्‍चिम महाराष्ट्राकडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

हिंगोली - येथील राज्य राखीव दलातील भरती गैरव्यवहारात पश्‍चिम महाराष्ट्रातील एका मार्गदर्शन केंद्राकडे संशयाची सुई वळत असून, या मार्गदर्शन केंद्राची चौकशी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. पोलिसांनीही याला दुजोरा दिला असून, पश्‍चिम महाराष्ट्रात हे मार्गदर्शन केंद्र नेमके कोठे आहे याबाबत मात्र माहिती देणे टाळले जात आहे.

येथील राज्य राखीव दल भरती प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली असून, त्यानंतर सोमवारी (ता. 11) आणखी दोघांना अटक करण्यात आली. या दोघांकडून आणखी काही माहिती हाती लागते काय, याची शहानिशा पोलिसांकडून केली जात आहे.

Web Title: recruitment scam western maharashtra crime