व्यापाऱ्यांच्या सहकार्याने सर्वाधिक ‘जीएसटी’ नोंदणी

- शेखलाल शेख 
शनिवार, 14 जानेवारी 2017

डिलिव्हरिंग चेंज फोरमच्यावतीने भारतात २४ आणि २५ जानेवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. जगभरात उद्योग, प्रशासन, कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक बदल घडविणाऱया 'चेंज मेकर्स'चा सहभाग हे परिषदेचे वैशिष्ट्य आहे. दोन दिवसांच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होणार आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ' समुह महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेत आहोत.
डिलिव्हरिंग चेंज फोरम
२४ व २५ जानेवारी २०१७ 
नेहरू सेंटर, मुंबई
अधिक माहिती व सहभागासाठी क्लिक करा
www.deliveringchangeforum.com

आगामी आर्थिक वर्षापासून वस्तू सेवा कर (जीएसटी) कायदा लागू होण्याची दाट शक्‍यता आहे. या कायद्याच्या पूर्वतयारीसाठी करासंदर्भात असलेले राज्य व केंद्र सरकारचे विभाग सक्रिय झाले आहेत. यामध्ये विक्रीकर विभागाचाही मोठा वाटा आहे. जीएसटी लागू होण्यापूर्वी या कायद्याअंतर्गत व्यापाऱ्यांच्या नोंदणीत राज्यात औरंगाबाद अव्वल ठरले. २०१६ मधील ही विक्रीकर विभागासह व्यापाऱ्यांसाठी मान उंचावणारी बाब ठरली. 

औरंगाबादच्या विभागीय विक्रीकर कार्यालयाअंतर्गत एकूण ३१ हजार ५८८ व्यापाऱ्यांची नोंदणी आहे. एक एप्रिल २०१६ पासून सर्व कर एकत्रित करून जीएसटी हा एकच कर राहण्याची शक्‍यता आहे. त्या धर्तीवर केंद्र सरकारतर्फे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. जीएसटीअंतर्गत व्यापाऱ्यांच्या नावनोंदणी अभियानाला १४ नोव्हेंबरपासून धडाक्‍यात सुरवात झाली. ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत औरंगाबाद, जालना आणि बीडमध्ये एकूण २५,५८९ व्यापाऱ्यांनी नोंदणी केली. त्यामुळे औरंगाबादची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. 

जास्तीत जास्त व्यापाऱ्यांनी जीएसटीअंतर्गत नोंदणी करण्यासाठी विक्रीकर विभागाने पहिल्यापासून ते अखेरच्या दिवसापर्यंत व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. यामध्ये प्रामुख्याने बल्क एसएमएस सेवा, माध्यमांतून जाहिरात, जनजागरुकता अभियान, व्यापारी बैठका, चार्टर्ड अकाउंटंट आणि टॅक्‍स प्रॅक्‍टिशनर्स असोसिएशनच्या बैठका आणि दूरध्वनीने संपर्क साधण्यात आला. त्यामुळे व्यापारी आणि विक्रीकर अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये खेळीमेळीचे वातावरण निर्माण होण्यास मदत झाल्याचे विक्रीकर सहआयुक्‍त डी. एम. मुगळीकर सांगतात.

करदात्यांचा सत्कार 
विक्रीकर दिनानिमित्त एक ऑक्‍टोबरला विभागातील सर्वोत्कृष्ट दहा करदाते आणि १३ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. व्यापारी आणि विक्रीकर विभागात खेळीमेळीचे वातावरण निर्माण होण्यासाठी विक्रीकर दिनाचे औचित्य साधून क्रिकेट सामना घेण्यात आला. यामध्ये सहभागी झालेल्यांचा विक्रीकर विभागातर्फे सत्कार करण्यात आला.

Web Title: Register Most GST collaboration with traders