धीरज देशमुखांवरील आक्षेप फेटाळला 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

लातूर - एकुर्गा (ता. लातूर) जिल्हा परिषद गटातील कॉंग्रेसचे उमेदवार धीरज विलासराव देशमुख यांच्यावर आक्षेप घेणारा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी रामेश्वर रोडगे यांनी फेटाळला. दरम्यान गुरुवारी सर्व अर्जांची छाननी करण्यात आली. यात दोन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. त्यामुळे आता तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या दहा गटांसाठी 66 तर पंचायत समितीच्या 20 गणांसाठी 104 उमेदवार राहिले आहेत. उमेदवारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कोणता उमेदवार अर्ज परत घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

येथील तहसीलमध्ये सर्वच अर्जांची छाननी करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी रामेश्वर रोडगे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय वारकड उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या एकुर्गा गटातून धीरज देशमुख हे निवडणूक लढवीत आहेत. या गटांकडे सर्वांचेच लक्ष आहे. गटातून बारा उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. छाननी प्रक्रियेच्या वेळी तय्यब सय्यद यांनी धीरज देशमुख यांच्या अर्जावर आक्षेप घेतला. रोकडेश्वर कन्स्ट्रक्‍शनचे धनंजय देशमुख हे प्रमुख आहेत. ते धीरज देशमुख यांचे चुलत बंधू आहेत. या कंपनीत त्यांचा हितसंबंध आहे. त्यामुळे त्यांचा अर्ज रद्द करावा अशा आशयाचा हा आक्षेप होता; पण सबळ पुरावे ते सादर करू शकले नाहीत. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी रोडगे यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन हा आक्षेप फेटाळून लावला. 

दरम्यान, पाखरसांगवी गणातील वसंत लिंबाजी करे यांनी उमेदवारी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र जोडले नाही किंवा वैधतेसाठी सादर करण्यात आल्याची पावतीही जोडली नाही म्हणून त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला आहे. तसेच श्रीमंत अर्जुन येवते पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर असलेला सूचक हा इतर गटातील असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला. त्यामुळे आता तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या दहा गटांसाठी 66 व पंचायत समितीच्या वीस गणांसाठी 104 उमेदवार राहिले आहेत, अशी माहिती श्री. वारकड यांनी दिली.

Web Title: Rejected the objection on Dheeraj deshmukh