पत्नीचा छळ करणाऱ्या न्यायाधिशांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

प्रल्हाद कांबळे
रविवार, 8 जुलै 2018

पत्नीचा छळ व दरोड्याचा गुन्हा दाखल असलेल्या न्यायाधिशांसह त्यांच्या अन्य नातेवाईकांनी अटकपूर्व जामीन अर्ज नांदेड न्यायालयात दाखल केला होता. परंतु तो अर्ज येथील जिल्हा न्यायाधीश हरिभाऊ वाघमारे यांनी फेटाळला आहे. मात्र या प्रकरणात माहूर येथील न्यायाधीश आणि त्यांच्या पत्नीला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.

नांदेड: पत्नीचा छळ व दरोड्याचा गुन्हा दाखल असलेल्या न्यायाधिशांसह त्यांच्या अन्य नातेवाईकांनी अटकपूर्व जामीन अर्ज नांदेड न्यायालयात दाखल केला होता. परंतु तो अर्ज येथील जिल्हा न्यायाधीश हरिभाऊ वाघमारे यांनी फेटाळला आहे. मात्र या प्रकरणात माहूर येथील न्यायाधीश आणि त्यांच्या पत्नीला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.

अॅड. शेख जलाल यांचे दोन पुत्र शेख वसीम अक्रम, शेख आमेर आणि त्यांचे जावई शेख जावेद सिद्धीकी तीनजण एकाचवेळी प्रथमवर्ग न्यायाधीश झाले. शेख वसीम अक्रमचे लग्न गुल अफशार यांच्या सोबत झाले. शेख वसीम अक्रम यांच्या पत्नी गुल अफशार यांनी 22 जून 2018 रोजी नांदेडच्या इतवारा पोलीस ठाण्यात हुंड्यासाठी त्यांचा छळ केला जात असल्याची तक्रार दिली. त्या तक्रारीत चार लाख रुपये माहेराहून आणण्याचा तगादा त्यांनी लावलेला होता. तसेच माझ्या माहेरी दरोडा टाकून आठ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने देखील चोरले आहेत. अशी नोंद तीने तक्रारीत नमुद केली केली होती. त्यानंतर इतवारा पोलिसांनी तीन न्यायाधीश शेख वसीम अक्रम, शेख आमेर आणि शेख जावेद सिद्धीकी यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

शेख जलाल यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज केला होता. परंतु या चार जणांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले आहेत. न्यायाधीश शेख जावेद सिद्धीकी व त्यांच्या पत्नी शेख फरनाज आणि न्यायाधीश नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेले शेख जुनेद यांचा मात्र अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यामुळे न्यायाधीश मंडळी व त्यांच्या नातेवाईकांमध्ये अटकेची भिती कायम राहिली आहे.

Web Title: Rejecting the anticipatory bail of the judges who persecuted the wife