'बेवडा दादा'च्या अॅडमिनचा जामीन फेटाळला 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - "बेवडा दादा' मित्रमंडळ या व्हॉट्‌सऍप ग्रुपवर शहरातील एका 25 वर्षीय विवाहितेचे छायाचित्र अश्‍लील चित्रफितींसोबत अपलोड करून बदनामी करणाऱ्या ग्रुप ऍडमिनसह तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. ए. पाटील यांनी सोमवारी (ता. 28) फेटाळला. परमेश्‍वर दौंड, ऍडमिन हरी दौंड व सोमिनाथ दौंड अशी त्या आरोपींची नावे आहेत.

 पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत ता. पाच नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी फिर्यादी विवाहितेच्या नातलगाने पीडितेला फोन करून सांगितले, की सुलतानपूर (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथे "बेवडा दादा' मित्रमंडळ नावाचा व्हॉट्‌सऍप ग्रुप असून, सदर नातेवाईक त्या ग्रुपचा सदस्य आहे. त्या ग्रुपवर परमेश्‍वर दौंड याने फिर्यादी पीडितेचे छायाचित्र अश्‍लील चित्रफितींसोबत अपलोड केले आहे. हरी व सोमिनाथ हे ग्रुपचे ऍडमिन आहेत. प्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरून सायबर सेलमध्ये आरोपींविरुद्ध माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात झाला होता. 
  
अटकपूर्व जामीन फेटाळला 
तिन्ही आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला असता, आरोपी परमेश्‍वरचा मोबाईलफोन, सिम कार्ड व त्यातील डेटा, रेकॉर्ड जप्त करावयाचे आहेत. किती महिलांना त्रास दिला आदींचा तपास करणे बाकी असल्याने आरोपींचा जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहायक सरकारी वकील राजू पहाडिया यांनी न्यायालयात केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com