परभणी : प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

गंगाखेड : गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रसुतीनंतर मातेचा मृत्यू झाल्याची घटना आज (शनिवार) सकाळी 10:30 वा.घडली.

पालम तालुक्यातील बोरगाव खुर्द येथे आपल्या माहेरी ही महिला बाळंतपणासाठी आली होती. या महिलेला प्रसव वेदना सुरू झाल्याने सकाळी 9 वाजता नातेवाईकांसोबत उपजिल्हा रूग्णालयात दाखल झाली. तिने सकाळी 9:10 वाजता प्रसूत होऊन गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र प्रसुतीनंतर रक्तस्त्राव झाला. रक्तत्राव थांबत नसल्याने तिच्या शरीरातील रक्त कमी झाले. रक्त कमी झाल्याने सकाळी 10:30 वाजता या महिलेचा मृत्यू झाला.

या महिलेचे नाव सीमा दीपक मोरे (वय 22)  रा.भनगी तालुका जिल्हा नांदेड येथील होती. डाॅक्टरच्या हलगर्जीपणा मृत्यू झालाचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. डाॅक्टरवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत उपजिल्हा रुग्णालयातून तिचा मृतदेह हलवणार नसल्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

Web Title: Relatives of deceased patient accused Doctor of negligence in Gangakhed