esakal | उस्मानाबादेत बाप्पांच्या आगमनासाठी कर्फ्यूत शिथिलता, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

Kaustubh Digavegaonkar

नवीन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर शुक्रवारी (ता.२१) रुजू होताच गणरायाच्या आगमनासाठी जनता कर्फ्यूमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला आहे. गणरायाच्या आगमनाच्या अनुषंगाने फुलांचे हार, गणेशमूर्तीसह इतर साहित्याची दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून इतर आस्थापना मात्र बंद राहणार आहेत.

उस्मानाबादेत बाप्पांच्या आगमनासाठी कर्फ्यूत शिथिलता, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

sakal_logo
By
सयाजी शेळके

उस्मानाबाद : नवीन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर शुक्रवारी (ता.२१) रुजू होताच गणरायाच्या आगमनासाठी जनता कर्फ्यूमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला आहे. गणरायाच्या आगमनाच्या अनुषंगाने फुलांचे हार, गणेशमूर्तीसह इतर साहित्याची दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून इतर आस्थापना मात्र बंद राहणार आहेत. त्यामुळे गणेश भक्तांनी समाधान व्यक्त केले आहे.

जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून प्रत्येक शनिवारी जनता कर्फ्यू लागू केला आहे. कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहवा. यासाठी हा जनता कर्फ्यू जिल्ह्यात पाळला जात आहे. दरम्यान उद्या शनिवारी (ता.२२) गणेश चतुर्थी आहे. म्हणजेच गणरायाचे आगमन होणार आहे. दरवर्षी गणरायाच्या आगमनाच्या दिवशी सार्वजनिक सुटी असते. मोठ्या जल्लोषात घरोघरी गणरायाचे आगमन होते.

वाचा - 'मारुतीच्या' रूपाने देशमुखांची औसा मतदारसंघात मजबूत तटबंदी, उटगेंना...

मात्र जनता कर्फ्यूमुळे यंदा गणरायाचे आगमन कसे करावे? अशी शंका गणेश भक्तांना होती. पालकमंत्री शंकररराव गडाख बैठकीत यासंदर्भात सर्वच लोकप्रतिनिधींनी जनता कर्फ्यू शिथिल करण्याची मागणी केली होती. मात्र तत्कालिन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांनी यावर निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे भक्तांमध्ये संभ्रम होता. अखेर नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्हाधिकारी म्हणून शुक्रवारी पदभार स्विकारला आहे. अगदीच काही तासात त्यांनी जनता कर्फ्यूमध्ये शिथिलता आणण्याचे आदेश काढले आहेत. गणेशमुर्तीची व गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या साहित्याची दुकाने सुरू राहणार आहेत. या दोन्ही आस्थापनाशिवाय अन्य आस्थापना बंद ठेवाव्या लागणार आहेत. ता.२२ आणि २९ ऑगस्ट रोजी जनता कर्फ्यूमध्ये शिथिलता राहणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे.
 

(संपादन - गणेश पिटेकर)

loading image
go to top