पूरपीडितांसाठी दोन ट्रक धान्य, इतर साहित्य 

प्रकाश बनकर
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

महापुरामुळे उद्धवस्त झालेल्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील लोकांच्या मदतीसाठी मराठा क्रांती मोर्चाने पुढाकार घेतला आहे. मोर्चाच्या माध्यमातून
औरंगाबादेतून सोमवारी (ता. 12) दोन ट्रक धान्य, कपडे, औषधी यासह इतर जीवनावश्‍यक साहित्य पाठविण्यात येणार आहे, क्रांती मोर्चाच्या तीन सेंटरवर ही मदत जामा केली गेली. 

औरंगाबाद - महापुरामुळे उद्धवस्त झालेल्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील लोकांच्या मदतीसाठी मराठा क्रांती मोर्चाने पुढाकार घेतला आहे. मोर्चाच्या माध्यमातून
औरंगाबादेतून सोमवारी (ता. 12) दोन ट्रक धान्य, कपडे, औषधी यासह इतर जीवनावश्‍यक साहित्य पाठविण्यात येणार आहे, क्रांती मोर्चाच्या तीन सेंटरवर ही मदत जामा केली गेली. 

पुरामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक जण बेघर झालेत. त्यांना मदत करण्याचा निर्णय क्रांती मोर्चाने घेतला आहे. या माध्यमातून काही संघटनांनी मोर्चाच्या माध्यमातून मदत पाठवली आहे. टीव्ही सेंटर, पुंडलिकनगर आणि सिडको एन-1 येथून मदतीचे साहित्य संकलन केले जात आहे. हे साहित्य एका बॉक्‍समध्ये पॅक करून वाटप केले जाणार आहे. यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे 20 समन्वयक या दोन्ही ट्रक सोबत जाणार आहेत. तेच महापूरग्रस्त गावांमध्ये पोचून मदत करणार आहेत. टीव्ही सेंटर येथील बुलंद छावा कार्यालयात सुरेश वाकडे, सतीश वेताळ, मनोज गायके, गिरीश झाल्टे, अकंत चव्हाण, योगेश औताडे, प्रदीप हारदे, तर पुंडलिकनगरातील संभाजी बिग्रेडच्या कार्यालयात शिवानंद भानुसे, बाबासाहेब दाभाडे, संजय सोमवंशी, नीलेश शेलार, वैशाली खोपडे, विठ्ठल खांदेभराड, पंढरीनाथ काकडे, प्रशांत देशमुख, रेणुका सोमवंशी, रेखा वाहटुळे, रमेश गायकवाड, जय भावानीनगर येथील 44 लोकांचा स्वराज ग्रुपच्या हे समन्वयक काम पाहत आहेत. 
  
दोन दिवसांत या वस्तू झाल्या जमा 
सहा क्‍विंटल गृह, पाच क्‍विंटल साखर, 50 किलो तेल, दोन क्‍विंटल पीठ, 23 क्‍विंटल 50 किलो तांदूळ, पाचशे पंधरा मेडिसीन बॉक्‍स, सेनेटरी नॅपिक पॅड पाकीट, नऊशे गोण्या साड्या, पुरुषांसाठी 10 गोणी ड्रेस, लहान मुलांसाठी सहा गोण्या ड्रेस, एक गोणी स्वेटर, पाच गोणी चादर, 49 पाणी बॉटल बॉक्‍स, 88 मोठे बिस्किट बॉक्‍स यासह चिवडा, परसानही जमा झाले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Relief for flood victims