जालन्यात नगरपालिकेकडून अतिक्रमणांवर हातोडा

उमेश वाघमारे
गुरुवार, 22 मार्च 2018

जालना शहरातील शिवाजी पुतळा परिसरातील बीएसएनएल ऑफिस, पोस्ट ऑफीससमोर अनेक टपऱ्या, दुकानांनी अतिक्रमण केले होते. या ठिकाणचे अतिक्रमण काढण्यासाठी नगरपालिकेने गुरुवारी (ता. 22) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सुरवात केली आहे.

जालना - जालना शहरातील शिवाजी पुतळा परिसरातील अतिक्रमणे काढण्यास गुरुवारी (ता. 22) सकाळी जालना नगरपालिकेने सुरवात केली आहे. या परिसरातील अतिक्रमण केलेल्या वीस ते पंचवीस टपऱ्या, दुकांना जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत.

जालना शहरातील शिवाजी पुतळा परिसरातील बीएसएनएल ऑफिस, पोस्ट ऑफीससमोर अनेक टपऱ्या, दुकानांनी अतिक्रमण केले होते. या ठिकाणचे अतिक्रमण काढण्यासाठी नगरपालिकेने गुरुवारी (ता. 22) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सुरवात केली आहे. आतापर्यंत नगरपालिकेच्या पथकाने या ठिकाणावरील सुमारे वीस, पंचवीस अतिक्रमणे जमीनदोस्त केली आहेत. दरम्यान या मोहिमेमध्ये नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्यासह नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित आहेत. विशेष म्हणजे हे अतिक्रमण पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये काढण्यात येत आहे. 

 

Web Title: Removing encroachment in Jalna from the municipality