काम सुरू केल्यानंतर वाढीव खर्चाची आठवण 

Aurangabad_Municipal
Aurangabad_Municipal

औरंगाबाद - महापालिकेवर पराकोटीची टीका झाल्यानंतर संत एकनाथ रंगमंदिर देखभाल दुरुस्तीसाठी गेल्या चार महिन्यांपासून बंद करण्यात आले आहे. दुरुस्ती, रंगमंदिर वातानुकूलित करण्याच्या स्वतंत्र निविदा काढल्यानंतर आता प्रशासनाला वाढीव कामांची आठवण झाली आहे. त्यानुसार आता संपूर्ण खर्च आठ कोटींच्या घरात जाणार असून, तसा प्रस्ताव आता सर्वसाधारण सभेसमोर येणार आहे. 

संत एकनाथ रंगमंदिराच्या दुरवस्थेवरून महापालिका प्रशासनावर मोठी टीका झाली. प्रकरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत गेल्यानंतर महापालिकेतील पदाधिकारी, प्रशासन व लोकप्रतिनिधींना जाग आली. त्यानुसार तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांनी रंगमंदिराच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद केली. महापालिकेने देखील त्यात 50 लाखांची भर टाकली. त्यानुसार दुरुस्तीचे कामही सुरू करण्यात आले. दरम्यान, वातानुकूलित करण्याचा प्रस्तावही सर्वसाधारण सभेत मंजूर केला होता. एक कोटी 78 लाख रुपयांचे हे काम मुंबईच्या हाईअर एअरकॉन लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे. त्यानंतर आता उर्वरित कामांची आठवण प्रशासनाला झाली असून, शुक्रवारी (ता. 15) महापौरांनी आढावा घेतला असता, अधिकाऱ्यांनी वाढीव खर्चाची बाब समोर आणली. त्यानुसार प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर सादर केला जाणार आहे. 
 
अशी आहेत नवी कामे 
रंगमंच अद्ययावत करून विद्युतीकरण, कॅटवॉक, ऑडिटोरियमचे विद्युतीकरण, ध्वनिक्षेपक यंत्रणा आगरोधक यंत्रणा बसविण्यात येणार आहे. रंगमंदिराचे सभागृह व रंगमंचाचे सीलिंग, पार्टिशन, वॉल ऍकॉस्टिक, वॉल टाइल्स बसविले जाणार आहे. रंगरंगोटी, तुटलेल्या खुर्च्या, मुख्य दरवाजा, स्वच्छतागृह, उपाहारगृह, तिकीट घर इत्यादींची दुरुस्ती केली जाणार आहे. या सर्व कामांसाठी आता सुमारे आठ कोटींचा खर्च लागणार असल्याचे महापौरांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com