Republic Day 2020 : सैन्याच्या पलटणींच्या माघारीचा देखणा सोहळा : बीटिंग द रिट्रीट 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 January 2020

सूर्यास्ताच्या वेळी होणाऱ्या बीटिंग द रिट्रीट या कार्यक्रमाची भारतातील सुरवात मात्र 1950पासून झाली. तेव्हापासून दोन वेळा हा सोहळा रद्द करण्यात आला आहे.

औरंगाबाद : येत्या 26 जानेवारीला सार्वभौम भारताचा 70वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होईल. त्यानंतर तीन दिवसांनी या सोहळ्यासाठी दिल्लीत आलेल्या तिन्ही सैन्यदलाच्या तुकड्या परत आपापल्या छावण्यांमध्ये परततील. मात्र, त्याआधी होईल एक नयनरम्य, देखणा सोहळा... बीटिंग द रिट्रीट. 

राजधानी दिल्लीतील विजय चौकात हा "बीटिंग द रिट्रीट' सोहळा पार पडेल. तिन्ही सैन्यदलांची पथके कवायतीच्या माध्यमातून आपल्या सामर्थ्याचे सादरीकरण करतील. रायसीना हिल्सवर होणाऱ्या या सोहळ्याला राष्ट्रपतींसह तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि अन्य मान्यवर उपस्थित राहतील. 

Image may contain: 15 people, people standing, crowd and outdoor

काय आहे परंपरा? 

छावणीत माघारी जाण्याच्या या सोहळ्याची ही एक फार जुनी परंपरा आहे. याचे मूळ नाव "वॉच सेटिंग'. युद्ध सुरू असताना सूर्यास्त झाल्यावर रणांगणावरील सैनिक आपापल्या छावण्यांमध्ये परत जात. यावेळी एक सांगीतिक समारंभ आयोजित केला जाई. त्याला बीटिंग द रिट्रीट म्हणत. हाच सोहळा प्रजासत्ताक दिनाच्या समारोपप्रसंगी रायसीना हिल्सवर होतो. 

सूर्यास्ताच्या वेळी होणाऱ्या या कार्यक्रमाची भारतातील सुरवात मात्र 1950पासून झाली. यावेळी लष्कराच्या तिन्ही दलांचे बॅंण्ड एकच संगीत वाजवून या कार्यक्रमाची सुरवात करतात. "सारे जहॉं से अच्छा' हे गीतही वाजवले जाते. शेवटी राष्ट्रगीत झाल्यानंतर तिरंगा उतरवला जातो आणि त्यानंतर प्रजासत्ताक दिनासाठी दिल्लीत आलेल्या लष्कराच्या तुकड्या माघारी आपापल्या छावण्यांत जातात. 

Image may contain: one or more people and people on stage

गेल्या वर्षीचे वैशिष्ट्य 

गेल्या वर्षी प्रथमच तिन्ही सैन्यदलांच्या बॅंडने 27 धून वाजवल्या. यातील 25 धून भारतीय संगीतकारांनी तयार केल्या होत्या. या बीटिंग रिट्रीटमध्ये सैन्यदलांचे 18 बॅंड, 15 पाइप अँड ड्रम बॅंड सामील होतात. हे सर्वजण एकत्रितपणे सैन्याचे सर्वोच्च कमांडर, अर्थात राष्ट्रपतींना मानवंदना देतात. 

Image may contain: one or more people, crowd and outdoor

दोन वेळा सोहळा रद्द 

भारतात बीटिंग द रिट्रीट 1950पासून सुरू झाले. तेव्हापासून आतापर्यंत प्रत्येक 29 जानेवारीला विजय चौकात हा सोहळा होतो. पण आतापर्यंत दोन वेळा तो रद्द करण्यात आला आहे. 2001 साली गुजरातमध्ये भीषण भूकंप झाला. त्यावेळी हा सोहळा रद्द करण्यात आला. तसेच 29 जानेवारी 2009 रोजी देशाचे आठवे राष्ट्रपती वेंकटरामन यांचे निधन झाले होते. त्यावेळीही हा सोहळा रद्द करण्यात आला होता. 

हेही वाचा - 

...तर संजय राऊतांचं तोंड वंगणानं काळं करू

आंतरराष्ट्रीय गाजलेले चित्रपट पाहायचेत? चला औरंगाबादला! 

 एका क्‍लिकवर वाचा औरंगाबादची गुन्हेगारी     

नाशिकच्या मुलीसोबतही झाला होता तो प्रकार!

सत्तेतल्या नेत्यांनो, वायफळ बडबड करू नका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Republic Day 2020 Beating The Retreat Delhi Raisina Hills