
येथील प्रसाद मंगल कार्यालयात दुपारी बारा वाजता उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, तहसीलदार अरविंद बोळंगे, नायब तहसीलदार , निलेश पळसकर, लता लाखाडे, अनिल पाटील यांच्या उपस्थितीत सरपंच पदाचे प्रवर्ग निहाय आरक्षण काढण्यात आले.
वसमत (जिल्हा हिंगोली) : नुकत्याच संपन्न झालेल्या वसमत तालुक्यातील 119 ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत गुरुवारी तारीख 28 काढण्यात आली. आरक्षण सोडतीनंतर पॅनलचे बहुमत असताना सुद्धा आरक्षित सदस्य नसल्याने निवडणुकीत हरलेल्या पॅनल प्रमुखांच्या चेहऱ्यावर हास्य उमटल्याचे चित्र होते.
येथील प्रसाद मंगल कार्यालयात दुपारी बारा वाजता उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, तहसीलदार अरविंद बोळंगे, नायब तहसीलदार , निलेश पळसकर, लता लाखाडे, अनिल पाटील यांच्या उपस्थितीत सरपंच पदाचे प्रवर्ग निहाय आरक्षण काढण्यात आले. यावेळी 119 ग्रामपंचायती पैकी अनुसूचित जाती 19 यामध्ये अनुसूचित जाती महिला 10, अनुसूचित जमाती चार यापैकी अनुसूचित जमाती महिला दोन, नागरीकांचा मागास प्रवर्ग 32 यापैकी नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला सोहळा, सर्वसाधारण प्रवर्ग 64 यापैकी सर्वसाधारण प्रवर्ग महिला 32 यांचा समावेश आहे.
अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये दाभडी, पार्डी बु भोरीपगाव, बोराळा, हट्टा, जवळा बु, चिखली, कोणाथा, भोगाव तर महिलांसाठी मुडी, ढवूळगाव, पुयनी खु, पळशी ,मरलापुर, रांजोना, दोनवाडा, लिंगी, खांबाळा, धानोरा त आरळ यांचा समावेश आहे. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी कोठारी रायवाडी तर महिलांसाठी कुरुंदवाडी व सेलु या गावांचा समावेश आहे. नागरीकांचा मागास प्रवर्ग मध्ये हिवरा खु ,सिंगी, रेऊलगाव, राजापूर, मुरुंबा बु, तेलगाव, टेंभुर्णी, खापरखेडा, कुपटी, रोडगा, सावंगी बु ,इंजनगाव, कागबन, बळेगाव, माटेगाव ,नहाद तर महिलांसाठी किन्होळा, कौठा, गणेशपुर, चोंडी त सेंदुरसना, तुळजापूरवाडी, दगडगाव, परळी, मरसुल त सेंदुरसना, मोहगाव, रिधोरा, सुनेगाव ,हिरडगाव, सिरळी ,करंजी ,दारेफळ, महागाव यांचा समावेश आहे. खुला प्रवर्ग मध्ये अकोली, एकरुखा, कन्हेरगाव, कळंबा, कोर्टा ,खांडेगाव, गुंडा, टाकळगाव डिग्रस खू, पळसगाव त माळवटा, पांगरा त धामणगाव, पिंपराळा, पिंपळगाव कुटे, बाभुळगाव, बोरगाव खु, बोरीसावंत, ब्राह्मणगाव बु, भेंडेगाव ,म्हातारगाव ,रुंज त आसेगाव ,लोण बु, वाई त धामणगाव ,वाखारी ,वाघी, विरेगाव, सोन्ना त हट्टा, कुरुंदा, आरळ ,आंबा ,आडगाव ,लहान पिंपळा चौरे तर महिलांसाठी असेगाव ,कानोसा, कुडाळा खुदनापूर ,गिरगाव ,गुंज त असेगाव, जवळा त बाभुळगाव, जुनूना, धामणगाव, परजना, पांगरा शिंदे ,पारवा ,पारडी खुर्द, पुयणी बु, बोरगाव बु माळवटा, वापटी, सातेफळ त आरळ, सारोळा ,सोमठाणा, कौडगाव, दगडपिंप्री, रेणकापूर, पांगरासती, लोळेश्वर, रायवाडी हयातनगर, हापसापूर, सुकळी करंजाळा ,महमदपूरवाडी, थोरावा आदी गावांचा समावेश आहे.
संपादन - प्रल्हाद कांबळे