ग्राहकांना बदलावे लागणार एटीएम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - मॅग्नेटिक स्ट्रिप असलेल्या एटीएम कार्डचा डेटा कॉपी करून गैरप्रकार होत आहेत. याला आळा घालण्यासाठी ग्राहकांना नवे चिप असलेले एटीएम कार्ड द्यावेत, असे आदेश रिझर्व्ह बॅंकेने सर्व बॅंकांना दिले आहेत. त्यानुसार सार्वजनिक बॅंकांसह इतर खासगी बॅंकांनी हे नवे कार्डवाटप हाती घेतले आहे. यानुसार स्टेट बॅंक ऑफ इंडियानेही (एसबीआय) ग्राहकांना हे कार्ड बदलण्यासाठी आवाहन केले आहे.

एसबीआयच्या ग्राहकांच्या सुरक्षेसाठी ही प्रक्रिया देशभरात सुरू करण्यात आली आहे. ता. ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत ग्राहकांना मुदत देण्यात आली आहे. त्यापूर्वी ग्राहकांनी बॅंकेत येऊन नवे कार्ड घेऊन जावेत, असे आवाहन करण्यात येत आहे. विनाशुल्क जुने कार्ड बदलून देण्यात येत आहे. याविषयी बॅंकेने त्यांच्या संकेतस्थळावर माहिती दिली आहे. 

यासह ग्राहकांकडून वर्षाकाठी घेण्यात येणारे मेंटनन्स शुल्कही घेत नसल्याचे सांगण्यात आले आहे. ता. २८ फेब्रुवारी २०१७ ला बॅंकेने काही कार्ड ब्लॉक केले आहेत. ते आतापर्यंत ब्लॉक असतील. ज्यांचे कार्ड ब्लॉक झाले आहे त्यांनी नव्या एटीएमसाठी बॅंकेत अर्ज करण्याचे आवाहन एसबीआयने केले आहे. मॅग्नेटिक कार्ड बदलण्यासाठी ग्राहकांना आपल्या शहरातील मुख्य शाखेत जावे लागणार आहे.

ऑनलाइन अर्जाची सुविधा 
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करीत हे एटीएम तुम्ही मागवू शकता. यासाठी बॅंकेच्या संकेतस्थळावर जाऊन ई-सर्व्हिसेस टेबलमध्ये एटीएम कार्ड सर्व्हिसवर क्‍लिक करून पुढील प्रक्रिया करता येईल.

Web Title: Reserve bank ATM Card