महापौर तुपे, उपमहापौर राठोड यांचा राजीनामा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

औरंगाबाद - होय, नाही करीत अखेर महिनाभरानंतर महापौर त्र्यंबक तुपे व उपमहापौर प्रमोद राठोड यांनी बुधवारी (ता. 30) सर्वसाधारण सभेत पदाचा राजीनामा दिला. पीठासीन अधिकारी म्हणून महापौरांच्या आसनावर बसलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक बन्सी जाधव यांच्याकडे श्री. तुपे यांनी राजीनामा दिला, तर श्री. राठोड यांनी महापौर तुपे यांच्याकडे राजीनामा दिला. दोघांनीही वैयक्‍तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे सभागृहात सांगितले. 

औरंगाबाद - होय, नाही करीत अखेर महिनाभरानंतर महापौर त्र्यंबक तुपे व उपमहापौर प्रमोद राठोड यांनी बुधवारी (ता. 30) सर्वसाधारण सभेत पदाचा राजीनामा दिला. पीठासीन अधिकारी म्हणून महापौरांच्या आसनावर बसलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक बन्सी जाधव यांच्याकडे श्री. तुपे यांनी राजीनामा दिला, तर श्री. राठोड यांनी महापौर तुपे यांच्याकडे राजीनामा दिला. दोघांनीही वैयक्‍तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे सभागृहात सांगितले. 

युतीच्या कराराप्रमाणे पहिले दीड वर्ष महापौरपद शिवसेनेकडे, तर उपमहापौरपद भाजपकडे, यानंतरचे एक वर्ष महापौरपद भाजपकडे, तर उपमहापौरपद शिवसेनेकडे आणि उर्वरित अडीच वर्षे महापौरपद शिवसेनेकडे, तर उपमहापौरपद भाजपकडे असे ठरले आहे. यानुसार शिवसेनेच्या महापौरांचा कार्यकाळ 30 ऑक्‍टोबरला पूर्ण झाला; मात्र अनेक कारणांनी त्यांचा राजीनामा लांबणीवर पडत होता. अखेर "मातोश्री'वरून शिवसेना पक्षप्रमुखांनी राजीनामा देण्याचे आदेश दिल्यानंतर बुधवारी (ता. 30) सभा बोलावून राजीनामा देण्यात आला. 
 

यात दिलीप थोरात, नंदकुमार घोडेले, गजानन बारवाल, राजू शिंदे, राजगौरव वानखेडे, सत्यभामा शिंदे, सीमा खरात, कीर्ती शिंदे, सुनीता आऊलवार, माधुरी अदवंत, संगीता वाघुले, जमीर कादरी, शिल्पाराणी वाडकर, सायली जमादार, भाऊसाहेब जगताप, मोहन मेघावाले, राजेंद्र जंजाळ, अफसर खान, शेख समीना, अंकिता विधाते, ज्योती अभंग, कैलास गायकवाड, रूपचंद वाघमारे, लता निकाळजे, आशा निकाळजे, सुभाष शेजवळ, अय्युब जहागीरदार आदींनी मनोगत व्यक्‍त करीत महापौरांच्या कार्याविषयी समाधान व्यक्‍त केले. 
 

महापौरांचा दीड तास कौतुक सोहळा 
उपमहापौर राठोड यांनी पीठासीन अधिकारी त्र्यंबक तुपे यांच्याकडे 3.15 वाजता राजीनामा सोपविला आणि ते सभागृहात सदस्यांमध्ये येऊन बसले. यानंतर महापौरांनी मनोगत व्यक्‍त केल्यानंतर काही सदस्यांनी ज्यांना बोलायचे आहे त्या नगरसेवकांना महापौरांविषयी दोन शब्द बोलण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली. यानंतर एकेकजण बोलण्यास सुरू झाले. हा कौतुक सोहळा तब्बल 4.45 पर्यंत सव्वा तास चालला. महापौरांच्या कार्यकाळाविषयी बोलताना सदस्य म्हणाले, की महापौरांनी सभागृह अतिशय संयमाने हाताळले. प्रश्‍नोत्तराचा तास सुरू करून व वेळेचे बंधन पाळण्याची सभागृहाला शिस्त लावण्याचे काम केले. विकास आराखड्यात नागरिकांना दिलासा दिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक, सफारी पार्क, शहरवासीयांवर आलेले समांतरचे संकट परतवून लावण्याचा निर्णय घेतला. राका जलतरण तलावप्रकरणी धाडसी निर्णय घेतला, असे सदस्यांनी मनोगतात सांगितले.

Web Title: The resignation of the mayor and deputy mayor