बीड जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद, पोलिसांकडून धरपकड 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

बीड - केंद्र सरकार सामान्यांविरोधी धोरणे राबवित आहे. एनआरसी, सीएए, एनपीआर हे कायदे संविधान विरोधी असल्याचा आरोप करत शुक्रवारी (ता. 24) पुकारलेल्या बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बीड शहर वगळता इतर ठिकाणी बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. बीड शहरातील काही बाजारपेठा वगळता कारभार सुरळीत होता. बंदचे आवाहन करत काही ठिकाणी फेऱ्या निघाल्या. पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली. 

नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी केंद्र सरकार कागदोपत्री पुराव्याची मागणी करत आहेत. भारतीय संविधानाने दिलेले नागरिकत्व व समान अधिकार काढून घेण्याचे षड्‌यंत्र रचले जात असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीसह इतर 35 संघटनांनी एकत्र येत शुक्रवारी बंदचे आवाहन केले. 

हेही वाचा - नगर-बीड-परळी लोहमार्गासाठी शासनाकडून 63 कोटींचा निधी

बीड शहरातील सुभाष रोड, धोंडीपुरा या प्रमुख बाजारपेठा बंद होत्या. इतर ठिकाणी फारसा परिणाम दिसला नाही. केज, अंबाजोगाई, परळी, माजलगाव, धारूर, वडवणी, पाटोदा व आष्टी या ठिकाणी दुपारपर्यंत बंदला प्रतिसाद मिळाला.

हेही वाचा - बीड जिल्ह्यात बिबट्याचा वावर, शेतकरी भयभीत

अनेक ठिकाणी बंदचे आवाहन करत फेऱ्या निघाल्या तसेच सरकारविरोधी निषेध फेऱ्याही काढण्यात आल्या. दरम्यान, गुरुवारी रात्रीपासूनच पोलिसांनी काही कार्यकर्त्यांची धरपकड केली. शुक्रवारीही वंचित बहुजन आघाडीच्या काहींना ताब्यात घेऊन नंतर सोडण्यात आले.

हेही वाचा - बीड जिल्ह्यात परिवर्तन पतसंस्थेच्या दोन संचालकांना बेड्या

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Response To The Bandh In Beed District