सेवानिवृत्त अभियंत्यांची अशीही सामाजिक बांधिलकी

Latur News
Latur News

लातूर : येथील पाटबंधारे खात्यातील सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता विजय गंगाधर शास्त्री यांनी कोरोनाग्रस्तांसाठी मदत म्हणून सामाजिक बांधिलकीतून आपल्या निवृत्तीवेतनातून ३५ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला आहे. हा धनादेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपुर्द करुन आपली संवेदनशीलता दाखविली आहे.

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे.  केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून येत्या ता.१४ एप्रिल २०२० पर्यंत देशात लॉकडाऊन जाहीर केले आहे. परिणामी सर्वत्र आर्थिक व्यवहार पूर्णतः बंद झाले आहेत. भारत आणि महाराष्ट्रातही आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे.  देश आणि राज्यावर आलेल्या या राष्ट्रीय आपत्तीला प्रत्येकाने आपापल्या परीने सामोरे जाणे आवश्यक आहे. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

याची जाणीव ठेवून, अंबाजोगाई रोडवरील सोहम सोसायटीतील पाटबंधारे खात्यातील सेवा निवृत्त विभागीय उपअभियंता विजय गंगाधर शास्त्री हे आपल्या पेन्शन खात्यातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्यासाठी  पुढे आले. त्यांनी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्याशी संपर्क साधून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ३५ हजार रुपयांचे देण्याचे सांगितले. त्याला प्रतिसाद देत जिल्हाधिकारी श्रीकांत  यांनी आपला  प्रतिनिधी  शास्त्री यांच्या निवासस्थानी पाठवून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठीचा शास्त्री यांनी देवू केलेला धनादेश  स्वीकृत केला.

दरम्यान, विजय शास्त्री यांच्या या राष्ट्रीय जाणीवेचे सर्वत्र कौतूक होत आहे. आज निर्माण झालेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासत्तठी दानशूर व्यक्तीनी सरकार आणि गरजूंसाठी पुढे येण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com