वेतनातून कपात केलेली रक्कम तीन महिन्यात जमा करा : औरंगाबाद खंडपीठ

court
court

औरंगाबाद : धुळे जिल्ह्यातून सेवानिवृत्त झालेल्या विस्तार अधिकारी तथा केंद्रप्रमुख यांच्या वेतनातून कपात केलेली रक्कम तीन महिन्यात परत करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या आैरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस व्ही गंगापूरवाला व न्यायमूर्ती एस. एम. गव्हाणे यांनी धुळे जिल्हा परिषद प्रशासनास दिले आहेत. याचिकाकर्ते धुळे जिल्हा परिषद अंतर्गत सेवेत होते. 

याचिकाकर्ते विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख पदावरून 2010 ते 2015 या कालावधीत सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर पाच ते सहा वर्षांनी काही रक्कम निवृत्तीवेतनातून जिल्हा परिषद धुळे यांनी कपात केली. तसेच उर्वरित रक्कम पुढील प्रत्येक महिन्यात त्या निवृत्तीवेतनातून वसूल करण्याचे आदेश धुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले होते. याविरोधात याचिकाकर्त्यांनी प्रारंभी धुळे जिल्हा परिषदेकडे दाद मागितली होती. परंतु काही निष्पन्न न झाल्याने अॅड. प्रतिभा भराड व इतरांच्या वतीने खंडपीठात याचिका दाखल केली. सेवानिवृत्तीनंतर काही वर्षांनी रक्कम वसूल करणे न्यायास धरून नाही. कारण वस्तुत: अशी जास्तीच्या पगारापोटी कोणतीही अतिरिक्त रक्कम मिळालेली नाही असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते.

आपले म्हणणे मांडण्याची संधीही दिली नसल्याचा युक्तीवाद अॅड. भराड यांनी केला. चुकीच्या वेतननिश्चितीमुळे अशी रक्कम वसूल करण्याचा अधिकार धुळे जि. प. ला असल्याचे म्हणणे जि. प. च्या वतीने मांडण्यात आले. खंडपीठाने जि. प. ची कृती रद्द करीत सदर प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या रफीक मसिह विरूद्ध पंजाब सरकार या प्रकरणात ठरवून दिलेल्या निकषात बसणारे असल्याचे म्हटले आहे. प्रकरणात शासनाच्या वतीने अॅड. व्ही. एस. बडाख, जि. प. धुळेतर्फे अॅड. राहूल पवार यांनी काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com