दुष्काळ पथकाच्या दौऱ्याने महसूल प्रशासनाची दमछाक 

राजेभाऊ मोगल
बुधवार, 5 डिसेंबर 2018

औरंगाबाद : ज्या विभागीय आयुक्‍त कार्यालयातून मराठवाड्याचा कारभार हाकला जातो. त्याच कार्यालयातून करण्यात आलेल्या सूचनांना कृषी विभाग दादच देत नसल्याचे केंद्रीय दुष्काळ पथक दौऱ्याच्या निमित्ताने मंगळवारी (ता. 4) समोर आले. या पथकाच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला माहिती कशी सादर करायची, कुठे आणि कसे जायचे याची जोरदार तयारी सुरु होती. मात्र, याअनुषंगाने कृषी विभागाकडून सोमवारी (ता.तीन) मागवलेली माहिती मंगळवारी दुपारी तीनपर्यंत देण्यातच आलेली नव्हती. 

राज्यातील विविध विभागातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी मंगळवारी केंद्राचे तीन पथक दाखल झाले. बुधवारी (ता.पाच) सकाळी नऊ ते साडेदहा दरम्यान विभागीय आयुक्‍तालयात या पथकासमोर दुष्काळीस्थितीची माहिती सादर करण्यात येणार आहे. यानंतर एक पथक औरंगाबाद जिल्हात भेटी देऊन जळगावकडे रवाना होईल. दुसरे पथक जालना येथून बुलडाणा येथे रवाना होईल. तर तिसरे पथक पुण्याच्या दिशेनी रवाना होईल. या पथकाना घेण्यास त्या-त्या विभागातील आयुक्‍त येतील. मराठवाड्यात दोनच दिवस पाहणी केली जाईल, तिसऱ्या दिवशी तिन्ही पथके मुंबईत एकत्र येऊन बैठक घेतील, असे आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितले. 

अशी होईल दौऱ्यास सुरवात
दुष्काळ निवारणासाठी केंद्राची मदत मिळावी, यासाठी बुधवारपासून केंद्रीय पथक मराठवाड्यात पाहणी करीत आहे. सकाळी साडेदहा वाजता विभागीय आयुक्‍तालयातून एक पथक टेंभापुरी (ता. गंगापुर) धरण येथे रवाना होईल. तेथे पाहणी करून पावणेबाराच्या सुमारास दहा किलोमिटरच्या अंतरावर असलेल्या मुर्मी येथे दाखल होतील. त्यानंतर पाच किलोमिटरवर असलेल्या सुलतानपुर येथे पाहणी करण्यात येईल. साडेबारा वाजेच्या सुमारास हे पथक जळगावसाठी रवाना होईल. 

दुसरे पथक बदनापुर (जि. जालना) तालुक्‍यातील देवगाव, जवसगाव, जालना तालुक्‍यातील एका गावाला भेट देऊन दुपारी दोन वाजता विश्रामगृह येथे पोहचतील. याठिकाणी मुक्‍काम करून गुरुवारी (ता.सहा) परभणी जिल्हातील सेलु तालुक्‍यातील गणेशपुर येथे सकाळी साडेनऊ वाजता पाहणी करतील. त्यानंतर साडेबारा वाजता परभणी तालुक्‍यातील पेडगाव, त्यानंतर रुडी येथे पाहणी करतील. दुपारी दोन वाजेच्या सुमारास बीड जिल्ह्यातील परळी तालुक्‍यात रेवली येथे पाहणी करतील. त्यानंतर माजलगाव, वडवणी, खडकी, जरुड, बीड तालुक्‍यातील कांबी येथे भेटी देऊन सायंकाळी सहा वाजता बीड येथील विश्रामगृह येथे पोहचतील. त्यानंतर औरंगाबादला रवाना होतील.

Web Title: revenue administration tired because of drought observation visit in aurangabad