पाठीवर थाप देऊन दादासाहेबांनी विधानसभेच कामकाज शिकवलं : बाळासाहेब थोरात 

nilanga news.jpg
nilanga news.jpg

निलंगा (लातूर) :  डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन झाले. ही बातमी ऐकताच मला धक्का बसला. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर (दादासाहेब) हे मुख्यमंत्री असताना मी पहिल्यांदाच निवडून विधानभवनात गेलो होतो. त्यामुळे त्यांच्या कामाच्या पद्धतीचा कार्यकाल जवळून पाहता आला. पाठीवरून हात फिरवून सांगण्याची पद्धत जशी असते. त्या पद्धतीनेच त्यांनी अम्हा नवख्या आमदाराना विधानसभेचे कामकाज शिकवलं, अशा आठवणी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जागवल्या. शुक्रवारी ता.७ निलंगा येथील अशोक बंगल्यावर निलंगेकर कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी ते आले होते. 

डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे आदरणीय व्यक्तिमत्त्व होतं. त्यांनी खूप मोठा कालखंड राजकीय सामाजिक जीवनात, पक्षाच्या कामासाठी दिला. राज्याच्या विकासामध्ये त्यांचा मोठा वाटा असून राजकीय कालखंड सर्वाधिक मोठा आहे. पाटबंधारे मंत्री असताना त्यांच्या हातून महाराष्ट्रभरातील मोठी धरणे उभारली गेली.

विदर्भातील गोसीखुर्द धरण म्हणजे फार मोठे धरण संपूर्ण विदर्भातील मोठमोठ्या जिल्ह्याला पाणी देण्याचं काम या धरणामुळे होत आहे. गडचिरोली भंडारा यासह अनेक जिल्ह्यांना या भागातील शिक्षणाचा शेतीसाठी फायदा झाला असून हरितक्रांती महाराष्ट्राला देण्याचे काम त्यांनी केलं आहे. त्यानंतर अनेक धरणे झाली. परंतु त्या धरणाच्या तुलनेत कमी आहे. ज्या विभागांमध्ये मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहेत. त्या विभागात वेगळा ठसा उमटविला. काम करण्याची सचोटी, नियोजन, पाठपुरावा पारदर्शकपणा याला तोड नाही. कुटुंबातला सदस्य म्हणून मी त्यांच्यासमवेत वावरत होतो. 

अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व जुन्या पिढीतील महत्त्वाचा माणूस गेल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात व समाजकारणात मोठी हाणी झाली आहे. डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मुख्यमंत्रिपदाचा काळ आपण पाहिला असून वसंतदादा पाटील यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदाची धुरा त्यांच्याकडे आली. आमदार असल्यामुळे प्रशासन कसं चालतं योजनेच्या माहिती अशा अनेक कार्य त्यांच्याकडून शिकायला मिळाले. एक आधारवड म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहायचो. वेळोवेळी त्यांचे झालेले मार्गदर्शन आम्हासाठी अविस्मरणीय आहे. माझे वडील स्वर्गीय भाऊ साहेब यांचे मित्र असल्यामुळे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध निलंगेकर कुटुंबीयांशी आहेत. 

मोठी पोकळी निर्माण झाली-मंत्री यशोमती ठाकूर
यावेळी महिला बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर याही उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या की, जुन्या संस्कृती जपणारा नेता एक मार्गदर्शक आमच्यातून हरवला आहे. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कौटुंबिक मार्गदर्शन त्यांनी वेळोवेळी केले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सामान्य कार्यकर्ता म्हणून आपला प्रवास राहील. शासन-प्रशासन कसे चालवायचे आहे. त्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळालं अशा आठवणी त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

निलंगेकर कुटुंबीयांची महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, वैदकिय शिक्षण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी अशोक बंगला निलंगा येथे भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी स्व. निलंगेकर साहेब यांच्या कुटुंबातील अशोकराव पाटील, शरदराव पाटील, विजयकुमार पाटील, माजीमंञी तथा आमदार संभाजीराव पाटील, अरविंद पाटील, डॉ. अरूण डावळे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी माजी आमदार वैजनाथ शिंदे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व्यकंट बेद्रे, जिल्हा अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, अभय साळुंके, बी. व्ही. मोतीपवळे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

संपादन-प्रताप अवचार
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com