महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या स्वागतासाठी गावात उभारल्या गुढ्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

गुढ्यांचा हा विषय  वझुर (ता. पुर्णा) जिल्ह्यात चर्चेचा ठरत आहे.

पुर्णा - वझुर (ता. पुर्णा) येथील भूमिपूजन कार्यक्रमासाठी वझुर गावात आलेल्या महसूल मंत्री चंद्रकात पाटील व पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या स्वागतासाठी गावकऱ्यांनी गुढ्या उभारल्या.

वझुर (ता. पुर्णा) या गावात गोदावरी नदीकाठच्या विकास कामाचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होत आहे. या कार्यक्रमास भाजपचे प्रदेश कार्यकारिणीत बरीच मोठी मंडळी हजर आहेत. गेल्या अनेक दिवसापासून या विकास कामाची गावकऱ्यांना प्रतीक्षा होती. 

विकास कामासाठी आलेल्या महसूल मंत्री चंद्रकांत पाटील व पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यासाठी गुढ्या उभारण्यात आल्या आहेत. गुढ्यांचा हा विषय जिल्ह्यात चर्चेचा ठरत आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Revenue minister chandrakant patils welcome in purna taluka