औरंगाबादच्या मद्य उद्योगातून शासनाला तीन हजार कोटींचा महसूल 

औरंगाबादच्या मद्य उद्योगातून शासनाला तीन हजार कोटींचा महसूल 

औरंगाबाद - औरंगाबादच्या चिकलठाणा, वाळूज एमआयडीसीतील दहा मद्यनिर्मिती कंपन्यांकडून यंदा राज्य उत्पादन शुल्क विभागाला 3 हजार 131 कोटी 21 लाख 6 हजार 885 रुपयांचा महसूल मिळाला आहे. या महसुलात दरवर्षी वाढ होत आहे. यंदा यात 22 टक्‍के वाढ आहे. 

औरंगाबादेत चिकलठाणा, वाळूज एमआयडीसीतील सहा बिअर आणि व्हिस्कीच्या चार अशा दहा कंपन्यांतून मद्यनिर्मिती केली जाते. या कंपन्यांकडून एप्रिल ते डिसेंबर 2018 पर्यंत 3 हजार 131 कोटी 21 लाख 6 हजार 885 रुपयांचा महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षी एक एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाला 3 हजार 685 कोटी 82 लाख रुपयांचा महसूल मिळाला होता. यंदा एवढाच महसूल केवळ नऊ महिन्यांत विभागाला मिळाला आहे. हा महसूल गेल्या वर्षीच्या महसुलापेक्षा 554 कोटी 57 लाख 14 हजार 526 रुपयांनी जास्त आहे. गेल्या वर्षीही 246 कोटी 39 लाखांनी महसुलात वाढ झाली होती. बिअर कंपन्यांच्या प्रत्येक उत्पादनावर राज्य उत्पादन शुल्कची नजर असते. राज्याचा कर भरल्याशिवाय उत्पादित होणारे कोणतेही मद्य उत्पादन विक्रीसाठी कंपनीबाहेर सोडण्यात येत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com