औरंगाबादेतील मोतीकारंजा, राजबाजार, शहागंजमध्ये रात्रभर दंगल

मनोज साखरे
शनिवार, 12 मे 2018

‌सहायक आयुक, निरीक्षक जखमी
‌दगडफेकीदरम्यान सहायक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांच्या घशावर दगडाचा फटका बसल्याने ते जखमी झालेत. त्यांना दर्गा परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच रामेश्वर थोरात आणि पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी जखमी झाले. तसेच या गोंधळात एक निरीक्षक रात्री चक्कर येऊन पडले होते. 

‌औरंगाबाद : मोतीकारंजा येथे दोन गट तलवारी, लाठ्याकाठ्यांसह शुक्रवारी (ता. 11) रात्री सडे दहाच्या सुमारास आपसात भिडले. सुमारे तास दिडतास तुफान दगडफेक झाली; यानंतर जमावाने दोन ऑटो रिक्षा पेटवून पोलिसांचाही वाहनावर दगडफेक केली. त्यामुळे या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. रात्री आठपासून सुरु झालेल्या धुसफूसीनंतर रात्रभर दंगलीचे वातावरण होते.

जुन्या वादातून दोन गट मोतीकारंजा येथे आपसात भिडल्यानंतर त्यांनी तलवार, लाठ्याकाठ्यांनी हाणामाऱ्या सुरु केल्या. त्यानंतर तुफान दगडफेक सुरु केली. त्यामुळे परिसरातील वातावरण स्फोटक बनले. दरम्यान क्रांतिचौक पोलिस पोचले परंतु त्यांच्या वाहनांवर दगडफेक जमावाने सुरु केली. भीषण परिस्थिमुळे एसआरपीएफची एक तुकडी, दंगा नियंत्रण पथक, उजळणी कोर्सचे पोलिस घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यानंतर परिस्थिती किंचित नियंत्रणात आली. घटनेनंतर शनिवारी पहाटेपर्यंत दंगेखोरांची धरपकड पोलिसांकडून सुरु होती, असे सूत्रांनी सांगितले.

‌वाहने पेटवली
‌मोठी दंगल उसळल्यानंतर जमावाने दोन ऑटो रिक्षा तसेच दुचाकीला लक्ष्य केले. हि वाहने पेटववून दिली. या घटनेनंतर ‌अग्निशामक दलाच्या एका बांबसह जवान रात्री साडे अकराला घटनास्थळी पोचले. त्यांनी रिक्षाची आग विझवली. आगीत रिक्षा अर्धवट जळल्याची माहिती अग्निशामक दलातील वाहनचालक सुभाष दुधे यांनी दिली.

‌सहायक आयुक, निरीक्षक जखमी
‌दगडफेकीदरम्यान सहायक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांच्या घशावर दगडाचा फटका बसल्याने ते जखमी झालेत. त्यांना दर्गा परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच रामेश्वर थोरात आणि पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी जखमी झाले. तसेच या गोंधळात एक निरीक्षक रात्री चक्कर येऊन पडले होते. 

- वाहनांची जाळपोळ 
- पोलिसांचे वाहन फोडले
- रस्त्यावरील वाहने केली लक्ष्य
- सहाशे पोलिस कुमक तैनात
- दंगेखोरांची धरपकड
- शहागंज, गुलमंडीत दुकाने पेटवली

Web Title: riot on motikaranja area in Aurangabad